अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या तिच्या अफेयरमुळे चर्चेत आली आहे. भूमी बॉलिवूडच्या एका हिरोच्या प्रेमात पडल्याचे सध्या कानावर येतेय. हा हिरो कोण तर जॅकी भगनानी. फिल्मफेअरने दिलेल्या वृत्तानुसार, भूमी व जॅकी यांच्यात सध्या एक वेगळेच बॉन्डिंग पाहायला मिळेतय. आत्तापर्यंत या दोघांत केवळ मैत्री होती. पण आता ही मैत्री यापलीकडे गेल्याचे कळतंय. इंटेक्स्ट लाइव्हनं दिलेल्या वृत्तानुसार, आता जॅकी तिला प्रोफेशनल सल्लेदेखील देऊ लागलाय.
नुकतंच एका जाहिरातीच्या शूटवेळी इंटेक्स्ट लाइव्हला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भूमीला हॅण्डल करणाऱ्या टीम मेंबर्समध्ये इंटरेस्टिंग चर्चा होत होती. त्यांचं म्हणणं होतं की जॅकीने भूमीला सल्ला दिला आहे की यशराज फिल्म्ससोबत नाते तोडून दे.
आता भूमी तिच्या बॉयफ्रेंडचं ऐकणार की नाही आणि ती प्रोडक्शन हाऊसचे चित्रपट करणार की नाही, हे पाहणं कमालीचं ठरणार आहे. यशराज फिल्म्सनं तिला दम लगा के हईशा सारखा चित्रपट दिला आहे.