अर्जुन कपूर (Arjun Kapoor), भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) आणि रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) यांचा 'मेरे हसबँड की बीवी' सिनेमा (Mere Husband Ki Biwi Movie) २१ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा सिनेमा रोमँटिक-कॉमेडी सिनेमा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुदस्सर अजीजने केले आहे. 'मेरे हसबँड की बीवी' या चित्रपटाचे शीर्षक झी मराठी वाहिनीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' (Mazya Navryachi Bayko) मालिकेवरुन सुचले, असा खुलासा भूमी पेडणेकरने केला आहे.
'मेरे हसबँड की बीवी' सिनेमामध्ये अर्जुनचे भूमीसोबत घटस्फोट होतो. रकुल त्याच्या आयुष्यात येते पण मग काय होईल की भूमी पुन्हा प्रवेश करते. पुढे काय घडते, हे पाहण्यासाठी चित्रपट पाहावा लागते. या चित्रपटाचे अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या प्रमोशन करताना दिसते आहे. दरम्यान एका मुलाखतीत तिने 'मेरे हसबँड की बीवी' या चित्रपटाचे शीर्षक झी मराठी वाहिनीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेवरुन सुचले असल्याचे सांगितले.
भूमी पेडणेकर म्हणाली...
भूमी पेडणेकर म्हणाली की, ''मेरे हसबँड की बीवी चित्रपटाच्या शीर्षकामुळे काही वर्षांपूर्वी आलेल्या 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेची आठवण झाली. ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर त्याचे शीर्षक वाचून प्रेक्षकांना लोकप्रिय मराठी मालिका आठवली. खरेतर आमचे दिग्दर्शक मुदस्सर अझीझ यांना 'माझ्या नवऱ्याची बायको' या मराठी मालिकेवरूनच चित्रपटाचे टायटल सुचले होते. त्यांचे मराठी खूप सुंदर आहे आणि त्यांनी ही मालिका पाहिली देखील आहे.''
सिनेमाने चौथ्या दिवशीच केली इतके कोटींची कमाई'मेरे पति की बीवी' चित्रपटाची कमाई पहिल्या दिवसापासून कमी आहे. विकी कौशलच्या प्रभावामुळे चित्रपटाला कठीण स्पर्धेचा सामना करावा लागतो आहे आणि त्याचा परिणाम त्याच्या कमाईवर दिसून आला. हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर स्ट्रगल करत आहे आणि त्याचे टिकणे आव्हानात्मक आहे. Sacnilk.com नुसार, चित्रपटाने चौथ्या दिवशी केवळ ५१ लाखांची कमाई केली. आतापर्यंत या चित्रपटाचे एकूण कलेक्शन केवळ ४.८२ कोटी रुपये आहे.