Join us

बॉलिवूडपासून दुरावल्यानंतर आईसोबत शेती करतेय ही अभिनेत्री, अखेर तिची इच्छा झाली पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 3:29 PM

ही अभिनेत्री चक्क आईसोबत शेती करते आहे.

महिन्यांतील जास्त दिवस चित्रपटांच्या शूटिंगसाठी बाहेर राहणारे कलाकार सध्या आपल्या कुटुंबियांसोबत वेळ व्यतित करत आहेत आणि घरातील कामे करत आहेत. वेळ व्यतित करण्यासाठी कुणी पुस्तकं वाचत आहेत तर कुणी जेवण बनवत आहे तर कुणी नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरदेखील सध्या अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करते आहे. ती तिची आई सुमित्रा पेडणेकर यांच्यासोबत हायड्रापोनिक्स म्हणजेच जलसंवर्धन शेतीचे ज्ञान घेत आहे.

आई व मुलीला एक गार्डन बनवायचे होते. आता असं वाटतंय दोघींचे हे स्वप्न साकार होत आहे. या संधीचा फायदा भूमी घेत आहे. तिने या वृत्ताला दुजोरा देत तिचा अनुभव शेअर केला आहे. ती म्हणाली की, मला व माझ्या आईला नेहमीच एक हाइड्रोपोनिक्स गार्डन बनवायचे होते. जिथे भाज्यांचे पीक घ्यायचे होते. स्थायी जीवनशैलीचा आनंद घ्यायचा होता. आम्हाला एक बाग हवी होती म्हणजे स्वतःची दिनचर्या घरापर्यंत आणू शकतो. आता आम्ही या विकासामुळे खूप खूश आहे.

ती म्हणाली की, क्वारंटाइनमध्ये हाइड्रोपोनिक्स सायन्स शिकण्याचे ठरविले आणि मी समजू शकले की पर्यावरण सुरक्षित ठेवण्याचा अर्थ. यावेळी मी माझ्या आईसोबत सक्रीय रुपात काम करते आहे. मला गर्व आहे की आमची बाग आता आठवड्यातून दोन दिवस जेवण देऊ शकते.

ती पुढे म्हणाली की, मी लॉकडाउनदरम्यान प्रकृतीच्या जवळ राहण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला जाणीव झाली की पूर्णपणे स्वयंपूर्ण राहू शकतो.

यासोबतच भूमी क्लायमेट वॉरियर मोहिमेचा एक भाग आहे. या अंतर्गत ती लोकांमध्ये जनजागृती करते आहे.

टॅग्स :भूमी पेडणेकर