दुसऱ्या लाटेनंतर देशाच्या लोकांना आणखीन खबरदारी का घ्यावी लागेल यावर बोलताना अभिनेत्री भूमी पेडणेकर म्हणाली, “अजून गोष्टी सहज घेण्याची वेळ आलेली नाही,” दुसऱ्या लाटेमुळे भारतावर प्राणघातक संकट ओढवले होते, ज्यामुळे देश जणूकाही पॅरलाइज्ड झाला आहे. भूमी नागरीकांना त्यांचा धीर न सोडण्याची कळकळीने विनंती करत आहे. कोविड-19च्या केसेसच्या संख्येत जरी घट होत असली तरी, आपण अजूनही महामारीच्या मध्यावरच आहोत आणि केसेसमध्ये होणारी वाढ टाळण्यासाठी आपल्याला आणखी जास्त सजग रहावे लागणार असल्याची भूमी लोकांना वारंवार आठवण करुन देत आहे.
देशातल्या प्रत्येकाने काळजी घ्यावी आणि विषाणूच्या प्रसारावर लक्ष देण्यासाठी शिफारस केलेल्या पध्दतींचा अवलंब करावा अशी भूमीची इच्छा आहे.ती म्हणते, ”आपण या महामारीच्या मध्यावर आहोत आणि आता गाफिल राहून चालणार नाही. जरी महामारी असली तरी आपल्या सर्वांना काम तर करावेच लागणार आणि कुटुंबाकडे देखील लक्ष द्यावे लागणार आहे, पण आपण सामाजिक अंतर राखणे, हात धुणे, त्यांना सॅनिटाइझ करणे नियमितपणे करण्याबद्दल आणि बाहेरुन घरी आल्यावर शिफारस केलेल्या पध्दतींचे अनुसरण करण्याबद्दल जागरुक असले पाहिजे. आपण नक्कीच प्रयत्नपूर्वक विषाणूला दूर ठेवू शकतो असा विश्वास तिने व्यक्त केला आहे.