बिदिता बागने म्हटले, बोल्ड सीन्स शूट करताना दडपणात होते दिग्दर्शक, मी म्हटले बिंधास्त करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 11:00 AM
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याचा रिलीज झालेला ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ हा चित्रपट बोल्ड सीन्समुळे चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटात किसिंग आणि ...
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याचा रिलीज झालेला ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ हा चित्रपट बोल्ड सीन्समुळे चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटात किसिंग आणि सेक्स सीन्सचा एवढ्या मोठ्या प्रमाणात भडिमार करण्यात आला की, अभिनेत्री चित्रगंधा सिंग हिने सुरुवातीला निम्म्या चित्रपटाची शूटिंग करून माघार घेतली. तिच्यानंतर अभिनेत्री बिदिता बाग हिला संधी मिळाली. याविषयी एका मुलाखतीत नवाजुद्दीनने सांगितले की, ‘चित्रगंधाचा किसिंग सीन्सला विरोध होता. त्यामुळे तिने चित्रपटातून वॉक आउट केले. त्यानंतर दिग्दर्शक कुशान नंदी यांनी बिदिता बागला संधी दिली. तिने केवळ बोल्ड सीन्सच दिले नाहीत, तर चित्रपटाची शूटिंगही पूर्ण केली.’ तर बोल्ड सीन्सविषयी जेव्हा बिदिताला विचारण्यात आले तेव्हा तिने दिलेले उत्तर अनेकांच्या भुवया उंचाविणारे ठरले. डेक्कन क्रॉनिकल या इंग्रजी साइटशी बोलताना बिदिताने म्हटले की, ‘चित्रपटात मी एकप्रकारे सेक्सी सीन्सचा चार्जच सांभाळला. चित्रपटातील सर्व सेक्स सीन्स खूपच पारंपरिक बॉलिवूड स्टाइलमध्ये शूट करण्यात आले आहेत. जेव्हा हे सीन्स शूट केले जात होते तेव्हा मला दिग्दर्शक कुशान नंदी यांच्या चेहºयावर प्रचंड दडपण दिसत होते. ते मला फार काही सांगत नव्हते, कारण अगोदरच एक अभिनेत्री या सर्व प्रकारामुळे चित्रपट सोडून पळून गेली होती.’ पुढे बोलताना बिदिताने म्हटले की, ‘एक दिवस मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, तुम्ही अगदी रिलॅक्स राहा. जर तुम्हाला एखादा सीन्स रिटेक करायचा असेल तर तसे आवर्जून सांगा. त्याने माझा हा सल्ला ऐकल्यावर फारसे न बोलता फक्त मान हलवून एकप्रकारची समंती दिली. मला असे वाटते की, जर तुम्हाला सेक्स सीन करायचेच आहेत, तर मग त्यात लाज कसली. उलट ते चांगले कसे करता येतील यावर अधिक लक्ष द्यायला हवे, असेही बिदिताने म्हटले. नवाजुद्दीन आणि बिदिताचा हा चित्रपट गेल्या शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचे बॉक्स आॅफिस कलेक्शन चित्रपटाच्या बजेटपेक्षा व त्याला मिळालेल्या स्क्रीन्सच्या तुलनेत अधिक आहे. चित्रपटान नवाज एका गॅँगस्टरच्या भूमिकेत आहे. पैशांसाठी तो लोकांचा खून करीत असतो. हा चित्रपट सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलीन फर्नांडिसच्या ‘ए जेंटलमॅन’ या चित्रपटाबरोबर रिलीज झाला आहे. शिवाय या चित्रपटाला कडवी टक्करही देत आहे.