Join us  

​बिग बी पुन्हा होणार मेणाचे!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2016 3:34 PM

होय, जगप्रसिद्ध मादाम तुसाँद संग्रहालयात बिग बी अमिताभ बच्चन  यांचा  मेणाचा पुतळा उभा राहणार आहे. आता तुम्ही म्हणाल, ही ...

होय, जगप्रसिद्ध मादाम तुसाँद संग्रहालयात बिग बी अमिताभ बच्चन  यांचा  मेणाचा पुतळा उभा राहणार आहे. आता तुम्ही म्हणाल, ही काय खोटी माहिती देतोयंं आम्ही. कारण सन २००० मध्येच अमिताभ यांचा मेणाचा पुतळा या संग्रहालयात उभारला गेला होता. विशेष म्हणजे, या संग्रहालयात पुतळा उभारण्यात आलेले अमिताभ हे बॉलिवूडमधील पहिले अभिनेते होते. यानंतर न्यूयॉर्क, हाँगकाँग, बँकॉक आणि वॉशिंग्टन येथील मादाम तुसाँदच्या संग्रहालयातही अमिताभ यांचा मेणाचा पुतळा उभारला गेला. आता मादाम तुसाँद संग्रहालयाला अमिताभ यांचा नवा पुतळा बनवायचाआहे.  यासाठी अलीकडे या संग्रहालयाच्या टीमने अमिताभ यांचे नव्याने मेझरमेंट घेतली. याचे काही फोटो अमिताभ यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहेत. तेव्हा बघूयात!