Join us

बिग बींना पुस्तक लिहिण्याचा तिटकारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2016 12:15 PM

 काही दिवसांपूर्वी बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या नाती नव्या नवेली आणि आराध्या यांच्यासाठी इमोशनल पत्रे लिहिली होती. ती ...

 काही दिवसांपूर्वी बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या नाती नव्या नवेली आणि आराध्या यांच्यासाठी इमोशनल पत्रे लिहिली होती. ती पत्रे खरंच खुप चांगली आणि भावुक करणारी होती. आता सर्वांना वाटतेय की, त्यांनी एखादे पुस्तक लिहावे. त्यांची प्रत्येक भाषेवर असलेली कमांड पाहता ते त्यांना सहज शक्य आहे, असे इतरांना वाटतेय.सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना पुस्तक लिहीण्याचा आग्रह धरला. तेव्हा बिग बी यांनी सांगितले,‘मी जरी इतर भाषांमध्ये तसा स्वयंपूर्ण असलो तरीही मला पुस्तक लिहिण्याचा खुप तिटकारा आहे. माझी सध्या तरी काहीच मानसिकता नाही की, मी एखादे पुस्तक लिहावे.’