Join us

सलमान खानच्या 'राधे' चित्रपटाच्या बाबतीत घेऊ शकतात हा मोठा निर्णय, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2020 17:15 IST

सलमान खानचे चाहते राधे चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा आगामी चित्रपट राधे यार मोस्ट वॉण्टेड भाईबद्दल चाहत्यांमध्ये क्रेझ आहे. हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार होता. पण कोरोना व्हायरसमुळे जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे चित्रपट निर्मात्यांच्या सर्व योजनेवर पाणी पडले. कोरोना व्हायरसच्या कहरनंतर आता या चित्रपटाच्या उरलेल्या शूटिंगला पुन्हा सुरूवात झाली आहे. ही माहिती स्वतः सलमान खानने स्वतः सोशल मीडियावर दिली होती जेव्हा तो ६ महिन्यांच्या ब्रेकनंतर शूटिंग सेटवर परतला होता. सलमान खानने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर राधेच्या शूटिंगला सुरूवात केल्याच्या पहिल्या दिवसाचा फोटो शेअर करून चाहत्यांना खुशखबर दिली होती.

आता चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनला सुरूवात झाली असून चित्रपटाबद्दल मोठी माहिती समोर येते आहे. रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याच्या तयारीत आहे. अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. असे म्हटले जात आहे की, सध्या सलमान खानचा राधे चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यासाठी निर्माते-दिग्दर्शक योग्य डीलसाठी बातचीत करत आहेत. जर निर्मात्यांना कोणता वेब प्लॅटफॉर्म चांगली किंमत द्यायला तयार असेल तर सलमान खानचा राधे ओटीटीवर रिलीज होऊ शकतो. खरेतर हा निर्णय सलमान खानच्या जास्त पचनी पडणार नाही. 

याबद्दल सलमान खान कित्येकदा बोलला आहे की, त्याला डिजिटल प्लॅटफॉर्म आवडत नाही. सलमान खानने त्याचे चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यासाठी नाकारले आहेत. मात्र आता चित्रपटगृहे गेल्या ७-८ महिन्यांपासून बंद आहेत आणि हळूहळू कित्येक कलाकार ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत.

अशात कदाचित सलमान खान आपल्या निर्णयावर पुन्हा विचार करत असेल आणि चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यासाठी होकार देऊ शकतो. 

टॅग्स :सलमान खान