Big Fight : अमिताभ बच्चन यांचा ‘सरकार-३’, तर रणबीर कपूरचा ‘जग्गा जासूस’ आमनेसामने
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2017 1:16 PM
वर्षाच्या सुरुवातीलाच ‘काबिल’ आणि ‘रईस’ या दोन मोठ्या बॅनरच्या सिनेमांमध्ये घमासान बघावयास मिळाले. आता एप्रिल महिन्यात आणखी अशाच दोन ...
वर्षाच्या सुरुवातीलाच ‘काबिल’ आणि ‘रईस’ या दोन मोठ्या बॅनरच्या सिनेमांमध्ये घमासान बघावयास मिळाले. आता एप्रिल महिन्यात आणखी अशाच दोन बड्या बॅनरच्या सिनेमांमध्ये फाइट रंगणार आहे. अमिताभ बच्चन स्टारर ‘सरकार-३’ आणि रणबीर कपूर याचा ‘जग्गा जासूस’ एकाच दिवशी रिलिज होणार असल्याने दोन्ही सिनेमांमध्ये घमासान रंगणार आहे. आता या दोघांमध्ये बाजी कोण मारेल हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.गेल्या काही दिवसांपासून ‘सरकार-३’च्या रिलिज डेटवरून बराचशी उलट-सुलट चर्चा रंगली होती. सुरुवातीला हा सिनेमा १७ मार्चला रिलिज होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र गेल्या बुधवारी दिग्दर्शक रामगोपाल वर्मा याने ट्विटरच्या माध्यमातून हा सिनेमा ७ एप्रिल रोजी रिलिज होणार असल्याचे जाहीर केले होते. कारण या दिवशी रामगोपाल वर्माच्या वाढदिवसाचे औचित्य साधले गेल्याचे कारण पुढे येत आहे. मात्र याच दिवशी ‘जग्गा जासूस’ हा सिनेमाही रिलिज होणार असल्याने बॉक्स आॅफिसवर दोघांमध्ये बिग फाइट रंगणार आहे. ‘सरकार-३’ हा सिनेमा राजकारणावर आधारित असून, अमिताभ बच्चन यांची यामध्ये मुख्य भूमिका आहे. या सिनेमाच्या पहिल्या आणि दुसºया भागात अमिताभ आणि त्यांचा मुलगा अभिषेक यांची जोडी बघावयास मिळाली होती. सरकार - ३ मध्ये अमिताभ व्यतिरिक्त सर्व स्टारकास्ट नवीन असली तरी, हा सिनेमा बॉक्स आॅफिसवर दमदार मजल मारणार असल्याचे भाकित केले जात आहे, तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून अडखळीच्या वाटेवर असलेल्या ‘जग्गा जासूस’चा मुहूर्त नेमका याच दिवशी काढण्यात आला आहे. रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांच्यातील वादामुळे हा सिनेमा पूर्ण होणार की नाही अशी शंका वर्तविली जात होती. अखेर या सिनेमाची शूटिंग पूर्ण झाली असून, त्याचे पोस्टर आणि ट्रेलर रिलिज करण्यात आले आहेत. समीक्षकांच्या मते दोन्ही सिनेमांचा क्लॅश हा अवघड असून, कलेक्शनवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. ‘सरकार-३’ हा राजकीय ड्रामा आहे, तर जग्गा जासूसमध्ये रणबीर कपूर जासूसच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘सरकार-३’चा विचार केल्यास याचा पहिला भाग २००५ मध्ये रिलिज झाला होता, जो बॉक्स आॅफिसवर हिट ठरला होता. यामध्ये अभिषेक बच्चन आणि कॅटरिना कैफच्या जोडीला प्रेक्षकांनी पसंत केले होते. २००८ मध्ये आलेल्या दुसºया भागात अभिषेकबरोबर त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन झळकली होती. दोन्ही सिनेमांनी बॉक्स आॅफिसवर चांगले कलेक्शन केले होते. त्यामुळे तिसरा भागही प्रेक्षकांचे मने जिंकण्यात यशस्वी होण्याची शक्यता आहे. त्या तुलनेत दिग्दर्शक अनुराग बासू यांचा ‘जग्गा जासूस’ही दमदार सिनेमा असून, ‘सरकार-३’ला जबरदस्त फाइट देण्याची क्षमता ठेवणारा आहे. हा सिनेमा रणबीर आणि कॅटरिना यांच्यातील वादामुळे चर्चेत आला होता. याच सिनेमाच्या शूटिंगदरम्यान हे लव्हबर्ड वेगळे झाले होते. त्यामुळे सिनेमाच्या शूटिंगवरही त्याचा परिणाम झाला होता. आता स्क्रिनवर ही जोडी काय कमाल करतेय हे बघणे मजेशीर ठरेल.