Join us

Kangana Ranaut : मोठी बातमी..! BMCवर कंगना राणौतने केले आरोप, म्हणाली की - 'आर्किटेक्टना मिळतेय ही धमकी'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 12:30 PM

Big news ..! Kangana Ranaut made allegations against BMC, saying that - the architect is getting this threat : कंगना राणौतने ट्विटच्या माध्यमातून बीएमसीवर मोठा आरोप केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सातत्याने बीएमसीवर हल्लाबोल करताना दिसते आहे. आता तिने आरोप केला आहे की बीएमसीच्या BMC भीतीपोटी कोणताच आर्किटेक्ट तिचे ऑफिस बनवण्यासाठी तयार नाही.

काही महिन्यांपूर्वी कंगना राणौतच्या ऑफिसवर अवैधरित्या बांधकाम केल्याचे कारण सांगून बीएमसीने कारवाई केली होती. आता कंगना राणौतने ट्विटच्या माध्यमातून आरोप केले आहेत की या घटनेला सहा महिने उलटले असतानाही तिचे कार्यालयाची ती डागडुजी करू शकलेली नाही. Kangana Ranaut made allegations against BMC, saying that - the architect is getting this threat

कंगना राणौतने ट्विटमध्ये सांगितले की, मी बीएमसीच्या विरोधातील केस जिंकले आहेत. आता मला एका आर्किटेक्टच्या माध्यमातून नुकसान भरपाईसाठी फाइल सादर करण्याची गरज आहे. मात्र कोणताच आर्किटेक्ट माझे काम करण्यास तयारी नाही. ते सांगतात की, बीएमसीकडून धमकी मिळते आहे की त्यांचे लायसन्स रद्द केले जाईल. माझ्या ऑफिसवर बीएमसीची कारवाई करून सहा महिने उलटले आहेत.

कंगना पुढे म्हणाली की, कोर्टाने बीएमसी मुल्यांकनकर्त्याला साइटचा दौरा करण्यासाठी सांगितला होता. पण ते कित्येक महिन्यांनंतरही आमचे कॉल घेत नाही. त्यांनी मागील आठवड्यात दौरा केला मात्र त्यानंतर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. हे त्या सर्वांसाठी आहे जे विचारत आहेत की तुझे घर का ठीक करत नाही. प्रत्येक कोपऱ्यात पाऊस आहे आणि मी याबद्दल खूप चिंतेत आहे.

कंगनाने धमकी दिली आहे की, ती त्या लोकांच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्याची योजना करत आहे. ज्यांनी मागील वर्षी वांद्रे येथे तिच्या नवीन कार्यालयावर बीएमसीच्या कारवाईत सहभाग घेतला होता.

सप्टेंबर, २०२०मध्ये बीएमसीने बेकायदेशीर बांधकाम केल्याचे सांगत वांद्रे येथील कंगनाच्या ऑफिसमधील काही भाग पाडला होता. ९ सप्टेंबरला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिल्यानंतर काम थांबवण्यात आले होते.

टॅग्स :कंगना राणौतमुंबई हायकोर्ट