Join us  

Video: रणवीरने जोडले महिला स्पर्धकासमोर हात; कारण ऐकून तुमच्याही डोळ्यात तरळेल पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2021 12:23 PM

Ranveer singh: या शोमध्ये आतापर्यंत सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी हजेरी लावली आहे. मात्र, यातील एक भाग चांगलाच चर्चेत आला आहे. यात रणवीरने चक्क एका महिला स्पर्धकासमोर हात जोडले आहेत.

उत्तम अभिनयशैली आणि अतरंगी स्टाइलमुळे कायम चर्चेत येणारा अभिनेता म्हणजे रणवीर सिंग (Ranveer Singh) . सोशल मीडियावर सक्रीय असलेला रणवीर सध्या चित्रपटांसोबत त्याच्या 'द बिग पिक्चर' (The Big Picture) या रिअॅलिटी शोमुळेही चर्चेत येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याने पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे.  या शोमध्ये आतापर्यंत सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी हजेरी लावली आहे. मात्र, यातील एक भाग चांगलाच चर्चेत आला आहे. या भागात रणवीरने चक्क एका महिला स्पर्धकासमोर हात जोडत नतमस्तक झाला आहे.

कलर्स टीव्हीने या शोचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये रणवीर एका महिला स्पर्धकासमोर हात जोडतांना दिसून येत आहे. विशेष म्हणजे या स्पर्धक महिलेने केलेलं काम पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळलं आहे.

अलिकडेच या शोमध्ये रोमा जी या महिला स्पर्धकाने हजेरी लावली होती. यावेळी आपल्या कुटुंबाविषयी सांगत असतांना त्या भावूक झाल्या. मुलाच्या निधनानंतर त्यांनी पुढाकार घेत आपल्या सुनेचं दुसरं लग्न करुन दिलं. हे ऐकून  रणवीरसह उपस्थित सगळेच जण भारावून गेले. सोबतच रणवीरने त्यांच्यासमोर हात जोडले. "माझ्या मुलाने आणि सुनेने फक्त चार महिने संसार केला. त्यानंतर माझ्या मुलाचं निधन झालं. त्यामुळे मी माझ्या सुनेचं कोमलचं दुसरं लग्न करुन दिलं. आज तिला आनंदात पाहून आम्हाला सुद्धा आनंद होतो", असं रोमाजी म्हणाल्या. त्यावर रणवीरने त्यांचं कौतुक करत नतमस्तक झाला.

"एका आईने मुलीचं लग्न केल्याचं आपण ऐकतो. पण एका सासूने पुन्हा सुनेचं दुसरं लग्न केलं हे फार क्वचित वेळा ऐकायला मिळतं. मी खरंच तुमच्यासमोर नतमस्तक झालोय", असं म्हणत रणवीर त्यांच्यासमोर हात जोडतो.दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करत "पाहा रोमाजी यांचा सासू ते आई असा अनोखा प्रवास फक्त ‘द बिग पिक्चर’ वर", असं कॅप्शन देण्यात आलं आहे. 

टॅग्स :रणवीर सिंगसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमाटेलिव्हिजन