Join us

"मी यापुढे कधाही.."; प्रभासला 'जोकर' म्हणाल्यानंतर ट्रोल झालेल्या अर्शद वारसीचं मोठं विधान, म्हणाला-

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 1:24 PM

प्रभासला जोकर म्हटल्याने अर्शद वारसी टीकेचा धनी झालेला. आता त्याने मोठं विधान करुन पुन्हा एकदा (prabhas, arshad warsi)

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अर्शद वारसी चांगलाच चर्चेत आहे. याची सुरुवात झाली ती म्हणजे अर्शदने 'कल्की २८९८ एडी' सिनेमा पाहून प्रभासला 'जोकर' म्हणाला तेव्हापासून.  एका मुलाखतीत अर्शदने प्रभासच्या अभिनयाबद्दल आणि त्याच्या 'कल्की'मधील भूमिकेबद्दल स्पष्ट मत व्यक्त केलं. पण त्यानंतर अर्शदला मनोरंजन विश्वातून आणि चाहत्यांकडून नाराजीच्या प्रतिक्रिया सहन कराव्या लागल्या. अखेर यावर अर्शदने पुन्हा एकदा त्याचं म्हणणं मांडलंय. 

प्रभासला जोकर म्हणाल्यानंतर आता अर्शद काय म्हणाला?

अर्शदने इंडिया टूडे चॅनलशी संवाद साधताना सांगितलं की, "प्रामाणिकपणे सांगू तर ठीक आहे. प्रत्येकाचा आपापला दृष्टीकोन असतो. आपल्या देशात लोकशाही आहे. त्यामुळे सर्वांना बोलायची मुभा आहे. जर तुम्ही एक सकारात्मक व्यक्ती असाल तर कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी तुम्हाला त्रासदायक ठरते. मी ज्या जगात वावरतो तिकडे कायम टीका सहन करावी लागते. याचा मला त्रास होतो. मी आता ठरवलंय की,  मी जो सिनेमा बघेल त्याला मी नावं ठेवणार नाही. मी माझ्या उर्वरीत आयुष्यात प्रत्येक अभिनेत्यावर प्रेम करेल."

अर्शद प्रभासला काय म्हणाला होता

समदीश भाटियाला दिलेल्या मुलाखतीत अर्शदने हे विधान केलं होतं. समदीशने अर्शदला विचारलं, शेवटचा कोणता वाईट सिनेमा पाहिलाय? त्यावेळी 'कल्कि २८९८ एडी' बद्दल बोलताना अर्शद म्हणाला की, "मला हा सिनेमा नाही आवडला. सॉरी प्रभास पण तो मला या सिनेमात जोकर वाटला. मला खूप वाईट वाटलं. मला मॅड मॅक्स सिनेमासारखं काहीतरी बघायला मिळेल याची अपेक्षा होती. मी तिथे मेल गिब्सनसारख्या कलाकाराला इमॅजिन करतोय. पण प्रभासने काहीतरी वेगळंच केलं. तो असं का करतो, मला खरंच कळत नाही."

 

टॅग्स :अर्शद वारसीप्रभास