Join us

​‘बिग बॉस’चे १२ वे सीझन असणार सर्वाधिक बोल्ड? घरात येणार लेस्बियन व गे कपल??

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2018 11:50 AM

‘बिग बॉस’ हा रिअ‍ॅलिटी शो कायम विवादांमुळे चर्चेत राहत आला आहे. लवकरच या शोचे १२ वे सीझन सुरू होणार ...

‘बिग बॉस’ हा रिअ‍ॅलिटी शो कायम विवादांमुळे चर्चेत राहत आला आहे. लवकरच या शोचे १२ वे सीझन सुरू होणार आहे. ‘बिग बॉस’च्या या सीझनबद्दल आत्तापासूनचं उत्सुकता दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे, हे आगामी सीझन सलमान खान आणि कॅटरिना कैफ हे दोघे होस्ट करताना दिसणार असल्याचे कळतेय. यामागचे कारण म्हणजे नव्या सीझनमध्ये स्पर्धक जोड्यांमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे हा शो सुद्धा सलमान व कॅटरिनाची जोडीचं होस्ट करताना दिसण्याची शक्यता आहे. आता ‘बिग बॉस’बद्दल एक वेगळी बातमी ऐकायला येतेय.होय, ‘टेलीचक्कर’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘बिग बॉस’चे आगामी सीझन कमालीचे बोल्ड असणार आहे. ‘बिग बॉस११’चा टीआरपी फार चांगला नव्हता. ‘बिग बॉस’च्या १२ व्या सीझनमध्ये ही कसर भरून काढण्याचे मेकर्सचे प्रयत्न असल्याचे कळतेय. यासाठी शोला बोल्डनेसचा तडका लावला जाणार असल्याची माहिती आहे. वृत्तानुसार, या सीझनमध्ये स्पर्धक जोड्यांच्या रूपात ‘बिग बॉस’च्या घरात येणार. यातही वादग्रस्त स्पर्धक आणण्याचा मेकर्सचा विचार आहे. यात सासू सून, बॉस सेक्रेटरी, वादग्रस्त पत्रकार येऊ शकतात. ‘बिग बॉस’च्या सूत्रांचे मानाल तर गे आणि लेस्बियन कपलही या घरात दिसू शकतात. एवढेच नाही तर अ‍ॅडल्ट स्टार किंवा स्ट्रीपर्सचाही शोध सुरु आहे. आता ही बातमी खरी ठरली तर ‘बिग बॉस’चे हे आगामी सीझन कधी नव्हे इतके वादग्रस्त ठरणार हे नक्की. आता यामुळे टीआरपी मिळतो की निव्वळ वाद रंगतात, ते बघणे इंटरेस्टिंग असणार आहे.ALSO READ : बिग बॉसच्या १२ व्या सिझनसाठी सुरू झाली ऑडिशन्सबिग बॉस या कार्यक्रमाची चर्चा फक्त देशातच नाही तर जगभरात असते. या कार्यक्रमाने हिंदीतच नाही तर आपल्या प्रादेशिक भाषांमध्येही आपली हुकुमत कायम ठेवली आहे. हा बिग बॉस कार्यक्रम नुकताच मराठीत सुरू झाला आहे. केवळ मराठीच नाही तर हिंदीमध्येही आपल्या कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने आणि अभिनयाने वेगळी छाप सोडणारे मराठी माणसांना कायम आपलेसे वाटणारे आणि मराठीचा झेंडा खऱ्या अर्थाने साता समुद्रापार नेणारे महेश मांजरेकर या कार्यक्रमाच्या सूत्रधाराच्या भूमिकेत दिसत आहेत.