Join us

Bigg Boss 15 : राकेश बापटची प्रकृती बिघडली, बिग बॉसच्या घरातून थेट रूग्णालयात केलं दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 10:06 AM

Bigg Boss 15; Rakesh Bapat Hospitlised : या गंभीर आजाराने त्रस्त आहे राकेश बापट, जाणून घ्या सविस्तर

बिग बॉस 15’मध्ये  (Bigg Boss 15) वाईल्ड कार्ड एन्ट्री करणारा राकेश बापट  याला रूग्णालयात हलवण्यात आलं आहे. होय, बिग बॉसमध्ये राकेशची (Rakesh Bapat Hospitlised) प्रकृती अचानक बिघडली आणि त्याला ताबडतोब बिग बॉसच्या घरातून थेट रूग्णालयात दाखल करण्यात आलं. ई-टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, 8 नोव्हेंबरच्या रात्री राकेशला किडनी स्टोनमुळे वेदना सुरू झाल्या. वेदना असह्य झाल्यावर काल 9 नोव्हेंबरला दुपारी त्याला रूग्णालयात हलवण्यात आलं. तूर्तास त्याच्यावर उपचार सुरू  तो सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. लवकरच बरा होऊन शोमध्ये परतण्याची शक्यता आहे. 

राकेशने अलीकडेच  नेहा भसीनसोबत शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री केली होती. त्याला बिग बॉसच्या घरात पाहून शमिता शेट्टीचा आनंद गगणात मावेनासा झाला होता. राकेशला पाहताच तिने त्याला कडकडून मिठी मारली होती. यावेळी तिला अश्रू अनावर झाले होते. राकेश व शमिता सध्या एकमेकांना डेट करत असल्याचं मानलं जातंय.

‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात शमिता आणि राकेश बापट यांची रोमॅन्टिक केमिस्ट्री चर्चेचा विषय बनली होती. सध्या राकेश बापट हा शमिता शेट्टीचा बॉयफ्रेन्ड म्हणून ओळखला जातोय. ‘बिग बॉस ओटीटी’मधून बाहेर पडल्यानंतरही शमिता व राकेश एकत्र दिसले होते.  बिग बॉसने नुकतीच घरामध्ये राकेश-शमितासाठी एक सुंदर डेट आयोजित केली होती. दोघेही घरातील इतर सदस्यांव्यतिरिक्त एकमेकांसोबत वेळ घालवताना खूप आनंदी दिसत होते.

राकेश बापटच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं तर  टीव्ही अभिनेत्री रिद्धी डोग्रासोबत 2011 मध्ये त्याचं लग्न झालं होतं. मात्र लग्नाच्या ८ वर्षातच दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 2019 साली दोघांनी घटस्फोट घेतला होता.

टॅग्स :बिग बॉसराकेश बापट