Bigg Boss 16 : बिग बॉसच्या घरात क्षणात सगळं काही बदलतं. एकमेकांचे मित्र एकमेकांचे वैरी होताना दिसतात. असंच काही घडलंय ते सुम्बुल तौकीर खान व शालीन भनोट या दोघांबद्दल. सुरूवातीलाच सुम्बुल व शालीन यांच्यात चांगली मैत्री झाली. पण शो पुढे सरकत असताना आता या मैत्रीत फूट पडताना दिसतेय.‘बिग बॉस 16’चा एक नवा प्रोमो समोर आला आहे. यात सुम्बुल व शालीन दोघंही बोलत आहेत. तू माझ्यासोबत असं का वागते आहेस? असं शालीन सुम्बुलला विचारतो. यावर, मी काय करतेय, असं सुम्बुल म्हणते. हीच तर खरी समस्या आहे, असं शालीन तिच्या या वाक्यावर म्हणतो. मग मात्र सुम्बुल मनातलं ते सांगायला लागते.
सुम्बुलला नॉमिनेशनमध्ये वाचवायला हवं, तिला सेफ करायला हवं असं तू एकदाही बोलला नाही. तुझ्याबद्दल इतकं बकवास बोललं गेलं होतं, तरीही मी आले होते तुझ्या जवळ..., असं ती म्हणते. यावर, मला तुझी गरज नव्हती.., असं शालीन संतापून म्हणतो. यावर मग काय आलास बोलायला? असा प्रश्न सुम्बुल करते. तिचं ते वाक्य ऐकून शालीन काहीसा अस्वस्थ होतो. अबे येडी, तुम्हें समझ नहीं आ रहा क्या? तुम मुझे इरीटेड कर रही हो..., असं तो म्हणतो. आता यानंतर काय होतं, हे तर तुम्हाला एपिसोड पाहिल्यानंतरच कळणार आहे.
अन्य एका प्रोमो गौतम विग आणि निम्रत कौर अहुवालिया यांच्यात भांडण होताना दिसतेय. यात निम्रत रडताना दिसते. हे भांडण बघता गौतम व निम्रतच्या मैत्रीतही दरी निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत.