'बस्ती की हस्ती' म्हणून ओळखला जाणारा लोकप्रिय रॅपर एमसी स्टॅन सध्या चर्चत आहे. काही दिवसांपुर्वी एक पोस्ट करत त्याने देवाकडे मृत्यू मागितला होता. त्यामुळे त्याचे चाहते काळजीत पडले होते. आता पुन्हा एमसी स्टॅनच्या चाहत्यांना चिंतेत टाकणारी बातमी समोर आली आहे. मुंबई ते सुरतपर्यंत तो बेपत्ता झाल्याचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
रॅपर एमसी स्टॅनचे हरवलेले पोस्टर्स वाहनांवर, भिंतीवर आणि खांबांवर लावण्यात आले आहेत. एमसी स्टॅन बेपत्ता झाल्याचे हे पोस्टर्स केवळ मुंबईतच नाही तर पनवेल, नाशिक, सुरत, अमरावती आणि नागपूरमध्येही आहेत. पोस्टर्सवर एमसी स्टॅनचा फोटो आहे आणि त्याच्यावर नाव आणि वयासह बेपत्ता असं नमूद केलं आहे. एमसी स्टॅन बेपत्ता झाल्याचे पोस्टर्स पाहून रॅपरसोबत काही बरे वाईच तर घडले नाही ना, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडतोय. त्याचे चाहते काळजी व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी हा एक पीआर स्टंट असल्याचंही म्हटलं आहे.
एमसी स्टॅन याने २ सप्टेंबर २०२४ रोजी शेवटची पोस्ट केली होती. त्यानंतर त्याने एकही पोस्ट केलेली नाही. शिवाय, गेल्या काही दिवसांपासून एमसी स्टॅन हा दु:खात होता. अलीकडेच त्याचं गर्लफ्रेंड बुबासोबतही ब्रेकअप झाला होतं. याबद्दलचे दु:ख त्याने अनेकदा इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. ब्रेकअपनंतर त्याने सातत्याने वित्रित्र इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केल्या होत्या. काही दिवसांपुर्वी त्याने 'या अल्लाह बस मौत दो', असं कॅप्शन लिहून दुआ मागतानाचा इमोजी शेअर केला होता. त्यानंतर त्याने 'थकलो' अशी स्टोरी शेअर केली होती.
पुण्यात जन्मलेला एमसी स्टॅन हा लाखो रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. अगदी कमी वयात त्याने स्वतःच्या मेहनतीवर प्रसिद्धी व श्रीमंती मिळवली आहे. एम सी स्टॅनचं खरं नाव अल्ताफ शेख असं आहे. पुण्यातल्या ताडीवाला रोड या भागात स्टॅनचं बालपण गेलं. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या या भागात लहानाचा मोठा झालेल्या स्टॅनने सातवीतच रॅपर व्हायचं ठरवलं होतं. आज त्याच्या रॅपचे जगभरात चाहते आहेत. अनेकदा सोशल मीडियावर त्याचे महागडे दागिने, बूट याची बरीच चर्चा रंगताना दिसते.