कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर जवळपास साडेतीन महिन्यांपासून थिएटर व नाट्यगृह बंद आहेत. त्यात ते लवकर सुरू होण्याचीही चिन्हे दिसत नाहीत. अशा परिस्थितीत काही सिनेमे डिजिटल माध्यमांवर प्रदर्शित होत आहेत. आज हॉटस्टार लाइव्हच्या माध्यमातून मोठी घोषणा करण्यात आली. यावेळी अक्षय कुमार, अजय देवगण, आलिया भट, वरुन धवन वाॅल्ट डिस्नी कंपनीचे चेअरमन उदय शंकर लाइव्हच्या माध्यमातून उपस्थित होते. 'दिल बेचारा' हा हॉटस्टारवर रिलीज होणारा पहिला सिनेमा असेल. या सिनेमाच्या माध्यमातून सुशांतला श्रद्धांजली वाहण्यात येईल.
अक्षय कुमाराचा 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमा रिलीज होईल. अजय देवगणचा बहुप्रतिक्षीत 'भुज द प्राइड ऑफ इंडिया', आलिया भटचा सडक 2 सिनेमादेखील हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. अभिषेक बच्चनचा 'द बिग बुल' सिनेमा देखील हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. तसेच कुणाल खेमूचा 'लूट केस' आणि विद्युत जामवालचा 'खुदा हाफिज' असे ऐकूण सात सिनेमा हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या सर्व सिनेमांची घोषणा करताना त्यांचे पोस्टरदेखील लाइव्ह प्रदर्शित करण्यात आले. भारतीय इतिहासात पहिल्यांदाच इतके मोठे कलाकारांचे सिनेमा एकाच प्लॉटफॉर्मवर रिलीज होणार आहेत. आता हे पाहणं उत्सुकतेचे आहे की प्रेक्षक या सिनेमांना ओटीटी प्लॉटफॉर्मवर कसा प्रतिसाद देतात.