बिनधास्त बॉलीवूड चित्रपट पोस्टर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2016 8:40 PM
काही चित्रपट हॉट असतात तर काही वेळा त्याचे पोस्टर्स. बेफिक्रे पोस्टर्स काढण्यात बॉलीवूडचा हात कोणीही धरु शकणार नाही. बºयाच ...
काही चित्रपट हॉट असतात तर काही वेळा त्याचे पोस्टर्स. बेफिक्रे पोस्टर्स काढण्यात बॉलीवूडचा हात कोणीही धरु शकणार नाही. बºयाच वेळा हे पोस्टर्स पाहूनच अनेकांच्या छातीत धडकी भरते. फर्स्ट इम्प्रेशन हे चांगले असावे म्हणून निर्माते, दिग्दर्शक खास पद्धतीचे पोस्टर्स काढतात. यामुळे प्रेक्षकांना आकर्षित करुन घेण्याचा प्रयत्न याद्वारे होतो. त्याचा किती लाभ होतो, हे चित्रपट पाहिल्यानंतरच दर्शकांना समजते. अशाच काही बिनधास्त चित्रपटांच्या पोस्टर्सची माहिती देत आहोत.पीके आमिर खानच्या या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये तो नग्नावस्थेत रेडिओ घेऊन उभा असल्याचे दाखविण्यात आले होते. या पोस्टरबद्दल वादविवादही झाले. त्यामुळे चित्रपटाची जाहिरातही मोठ्या प्रमाणावर झाली.दुनॉय ना जाने क्यों संजय शर्मा यांनी दिग्दर्शित केलेल्या दुनॉय ना जाने क्यों या चित्रपटाचे पोस्टर पाहून हा समलैंगिक संबंधावर आधारित चित्रपट असल्याचे जाणवते. या पोस्टरचीही बॉलिवूडमध्ये बरीच चर्चा झाली.राज ३ डी इम्रान हश्मी, बिपाशा बासू, इशा गुप्ता यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर असेच भडक होते. यात बिपाशाला पाहून अनेकांना हा चित्रपट पाहण्यावाचून राहावले नसेल. यातील गाणीही अर्थात गाजली.मस्तराम कपिल दुबे, राहुल बग्गा यांच्या भूमिका असलेल्या मस्तराम चित्रपटाचे पोस्टर वेगळे होते. पॉर्न रायटिंगवर आधारित या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारशी कमाल केली नाही.हेट स्टोरी २ सुरवीन चावला, जय भानुशाली, सुशांतसिंग यांनी अभिनय केलेल्या या चित्रपटाचे पोस्टरही आकर्षक होते. अनेकांना चित्रपटगृहाकडे वळविण्यात या चित्रपटाला बºयापैकी यश आले.क्या कूल है हम ३ तुषार कपूर, आफताब शिवदासानी, मंदाना करिमी यांच्या भूमिकेने क्या कूल है हम ३ चे पोस्टरही असेच द्विअर्थी असल्यासारखे होते. त्यामुळे हा चित्रपट किती चालला यापेक्षा याचा किती फायदा झाला हे पाहणे आवश्यक ठरेल.नशा शिवम पाटील आणि पूनम पांडे यांनी या चित्रपटात भूमिका केली होती. चित्रपटाचे पोस्टरही असेच होते. पूनम पांडे असल्याने चित्रपटाची चर्चा झाली असली तरी बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट साफ आपटला.