70 व 80 च्या दशकात चित्रपट म्हटले की, नायिकेसोबत खलनायिका हमखास दिसायची. याच काळात एन्ट्री झाली ती अभिनेत्री बिंदूची. यानंतर फार कमी वेळात बिंदू यांनी इंडस्ट्रीत स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. आज बिंदू यांचा वाढदिवस. 17 एप्रिल 1941 साली गुजरातमध्ये बिंदूचा जन्म झाला होता. आज आम्ही बिंदूबद्दल सांगणार आहोत.
कधी नायिका, कधी खलनायिका तर कधी आयटम डान्सर अशा अनेक भूमिकेत पडद्यावर झळकलेल्या बिंदू यांनी मॉडेलिंग करायला सुरुवात केली ती घरच्या परिस्थितीमुळे. सहा भावंडांमध्ये बिंदू सगळ्यात मोठ्या होत्या. पण त्या 13 वर्षांच्या असताना वडिलांचे निधन झाले आणि घराची संपूर्ण जबाबदारी बिंदू यांच्यावर आली. पैसे मिळवण्यासाठी त्यांनी मॉडेलिंग सुरु केले आणि 1962 मध्ये तिला दिग्दर्शक मोहन कुमार यांच्या ‘अनपढ’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
पहिल्या चित्रपटानंतर बिंदू यांना काम मिळेना. याचदरम्यान घरामागे राहणा-या चंपकलाल जवेरीसोबत बिंदू यांची ओळख झाली. मग मैत्री आणि नंतर प्रेम. घरच्यांनी बिंदू यांना अक्षरश: नजरकैदेत ठेवले. पण त्यांचं प्रेम कमी होण्याऐवजी आणखी बहरले. बिंदू यांनी वयाच्या १५ व्या वर्षीच त्यांचे शेजारी असलेले चंपकलाल झवेरी यांच्या प्रेमात पडल्या. तर वयाच्या १८ वर्षी त्यांनी लग्न केलं. चंपकलाल बिंदू यांच्याहून ४ वर्षांनी मोठे होते. बिंदू व चंपक यांनी सगळ्यांचा विरोध झुगारून लग्न केले. पण सासरच्यांनीही बिंदू व चंपक यांना घरातून हाकलून लावले. वडिलोपार्जित संपत्तीतूनही बेदखल केले. लग्नानंतर वर्षभरानंतर बिंदू यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत ‘दो रास्ते’ साईन केला. मात्र का कसे कुणास ठाऊक, पण या चित्रपटाचे शूटींग सुरु असतानाच त्यांच्याकडे चित्रपटांची रांग लागली. इत्तेफाक, डोली, आया सावन झूम केले असे चित्रपट तिच्या हातात होते.
1977 ते 1980 हा काळ त्यांच्यासाठी फारच कठीण गेला. त्यांचं करिअर सुरळीत सुरु होतं मात्र पर्सनल लाईफमध्ये त्यांनी अनेक उतार चढाव बघितले. त्यांनी कधी आई होण्याचं सुख मिळालं नाही याची त्यांना कायम खंत वाटली.
त्यांनी एका मुलाखतीत सांगितले, ' लग्नानंतर मी गरोदर राहिले. खूप आनंदाचं वातावरण होतं. तीन महिने झाल्यानंतर मी कामही करणं बंद केलं होतं. मात्र सातव्या माझा गर्भपात झाला. डोहाळजेवणाचं आयोजन केलं होतं त्याच्या आदल्याच दिवशी आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. मी अक्षरश: कोसळले होते. पण कदाचित तेच माझ्या नशिबात लिहिलं होतं. यानंतर ५ महिन्यांनी मी पुन्हा काम करायला सुरुवात केली. '