Join us

​BIOPIC TREND : आता ‘या’ भारतीय महिला क्रिकेटपटूच्या आयुष्यावर येणार चित्रपट!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 4:55 AM

सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकची चलती आहे. त्यातल्या त्यात स्पोर्ट बायोपिक तर हमखास यशस्वी फार्म्युला बनला आहे. जिवंत आख्यायिका असलेल्या क्रिडा ...

सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकची चलती आहे. त्यातल्या त्यात स्पोर्ट बायोपिक तर हमखास यशस्वी फार्म्युला बनला आहे. जिवंत आख्यायिका असलेल्या क्रिडा विश्वातील दिग्गजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटांना प्रेक्षकांचीही पसंती मिळत आहे. आता असेच आणखी एक स्पोर्ट बायोपिक तुम्हाला आम्हाला पाहायला मिळणार आहे. होय,  वन डे क्रिकेट विश्वात सर्वाधिक विकेट घेणारी महिला खेळाडू झुलन गोस्वामी हिच्या आयुष्यावरचे बायोपिक आपल्याला पाहायला मिळणार आहे. खुद्द झुलनने याबाबतची घोषणा केली आहे. एका इव्हेंटमध्ये तिने ही घोषणा केली.   याआधी सुद्धा माझ्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याचे प्रस्ताव माझ्याकडे आले होते. कदाचित बायोपिकला होकार देण्याची योग्य वेळ आली आहे, असे ती म्हणाली. या बायोपिकचे नाव ‘चकदहा एक्स्प्रेस’ असे असेल. हिंदी तयार होणाºया या चित्रपटाचे दिग्दर्शक असतील सुशांत दास. झुलन नदिया जिल्ह्यातील याच भागातील रहिवासी आहे. झुलन पहिली महिला खेळाडू आहे, जिच्या आयुष्यावर चित्रपट बनतोय. झुलन प्रमाणेच दिग्दर्शक दास हे सुद्धा या बायोपिकबद्दल कमालीचे उत्सूक आहेत. आत्तापर्यंत आपण महेन्द्र सिंह धोनी आणि सचिन तेंडुलकर यांच्यावर आयुष्यावर बेतलेले चित्रपट पाहिले. पण आमचा चित्रपट महिला क्रिकेटपटूच्या आयुष्यावरील पहिला चित्रपट असणार आहे. लवकरच या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरु होणार आहे. चकदहापासून तर लॉर्ड्सपर्यंत चित्रपटाचे शूटींग होईल. झुलनच्या भूमिकेसाठी आम्ही बॉलिवूडच्या काही उंचीने अधिक असलेल्या अभिनेत्रींशी चर्चा चालवली आहे. तूर्तास झुलनची भूमिका कोण साकारणार, हे मी सांगू शकत नाही. कारण अद्याप करार झालेला नाही. पण बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रींशी आमची चर्चा जारी आहे, असे ते म्हणाले.Also read : BIOPIC TREND: ऐतिहासिक व्यक्तींसारखे तंतोतंत दिसणारे २३ अभिनेतेझुलनच्या सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक 2017 च्या फायनलमध्ये जागा मिळवली होती. अर्थात इंग्लंडच्या टीमकडून केवळ नऊ धावांनी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. इंग्लंडविरूद्धच्या या सामन्यात झुलनने तीन विकेट घेतले होते. पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्याच्या चकदहा या लहानशा खेड्यात झुलनचा जन्म झाला. झुलन वन डेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी अभिनेत्री आहे. तिने १६४ सामन्यात १९५ विकेट्स घेतल्या.