जॉन अब्राहमसोबत ब्रेकअपनंतर अनेक वर्षांनी बिपाशा बासूने केले 'हे' वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 9:25 AM
बिपाशाने आपल्या करिअरची सुरुवात 2001 मध्ये अब्बास दिग्दर्शित अजनबी चित्रपटातून केली होती. बिपाशाने आतापर्यंत जवळपास 55 चित्रपट काम केले ...
बिपाशाने आपल्या करिअरची सुरुवात 2001 मध्ये अब्बास दिग्दर्शित अजनबी चित्रपटातून केली होती. बिपाशाने आतापर्यंत जवळपास 55 चित्रपट काम केले आहे. बिपाशा आपल्या लव्ह लाईफबाबत नेहमीच चर्चेत राहिली. बिपाशा बासू नेहमीच आपल्या नात्यांबाबत मोकळेपणाने बोलत असते.10 वर्ष बिपाशा आणि जॉन अब्राहम रिलेशनशीपमध्ये होते. जिस्म मध्ये दोघांची रिअल लाईफ केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर दिसली होती. दोघांची ऑन स्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली होती. जॉन तिच्या प्रेमाला समजू शकला नाही आणि तिच्यासोबत असलेल्या नात्याला त्यांने एका झटक्यात तोडले. बिपाशाला या सगळ्यातून बाहेर यायला बराच वेळ लागला. गेल्या वर्षी बिपाशाने करण सिंग ग्रोव्हरसोबत लग्न बंधनात अडकली. यानंतर बिपाशाने करणसोबत आपल्या नव्या आयुषाची सुरुवात केली. आज ती करणसह आपली मॅरिड लाईफ एन्जॉय करते आहे. तिला आपल्या एक्स बॉयफ्रेंडसोबत कोणत्याच पद्धतीचा कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही आहे. हिंदुस्तान टाइम्स दिलेल्या इंटरव्ह्यु दरम्यान बिपाशा म्हणाली होती की, हे कधीच शक्य नाही की माझ्या एक्स बॉयफ्रेंडसोबत टचमध्ये राहिन. बिपाशाचा हा इशारा जॉनकडे तर नाही ना. पुढे बिपाशा म्हणाली तो जर माणूस म्हणून चांगला असेल तर आपण विचार करु सुद्धा. ALSO READ : बिपाशा बासूला तिचा ‘हा’ फोटो वाटतो ऑल टाइम फेव्हरेट, तुम्हीही पहा!जॉनच्या आधी बिपाशाचे अफेयर डीनो मोरियासोबत होते. बिपाशा आणि डीनो आजही चांगले मित्र-मैत्रिण आहेत. ऐवढेच नाही तर बिपाशाच्या लग्नातही डीनो आला होता. मात्र जॉन याठिकाणी दिसला नव्हता. यावरुन बिपाशाला जॉनने दिलेल्या जखमा आजही ताज्या असल्याचे दिसतेय. सध्या तरी बिपाशा आणि जॉन आपल्या वैवाहिक आयुष्यात खुश आहेत. जॉन आणि डीनोनंतर बिपाशाचे नाव हरमन बवेजासोबत सुद्धा जोडण्यात आले होते. बिपाशा पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये काम करण्यास उत्सुक आहे. ऐवढेच नाही तरी मिळालेल्या माहितीनुसार ती सलमान खानच्या रेस 3 मध्ये झळकण्याची शक्यता आहे. या चित्रपट सलमनाच्या अपोझिट दीपिका पादुकोण दिसणार आहे. रेमो डिसुझा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.