Join us

लग्नाच्या चार वर्षानंतर आई बनणार बिपाशा बासू? कधीही येऊ शकते Good News !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 7:27 PM

लवकरच बिपाशा 'डेंजरस' या बेबसिरीजच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे.

हॉट आणि सेक्सी कपल अशी ओळख असणाऱ्या करणसिंह ग्रोव्हर आणि बिपाशा बासूची कायमच चर्चा असते. रेशीमगाठीत अडकल्यापासून ही जोडी कायमच या ना त्या कारणामुळे चर्चेचा विषय असते. आता हे कपल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण बिपाशा लवकरच गुड न्यूज देणार असल्याची चर्चा आहे. बिपाशा प्रेग्नंट असून बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहात असल्याचे बोलले जात आहे. लग्नाच्या 4 वर्षानंतर आता हे कपल चाहत्यांना गुड न्युज देण्याच्या तायरीत आहेत.  या दोघांनी लग्नानंतर त्याचे आयुष्याविषयी जाहीरपणे बोलणे टाळले. जेव्हा जेव्हा त्यांना खासगी गोष्टी विचारल्या जायच्या दोघेही यावर काहीही न बोलता मौनच बाळगणे पसंत करायचे. मात्र सततच्या विचारल्या जाणा-या प्रश्नावर अखेर बिपाशा बासूने पहिल्यांदाच आपलं मौन सोडले आहे. 

लवकरच बिपाशा 'डेंजरस' या बेबसिरीजच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. प्रमोशनवेळी दोघांना त्यांच्या फॅमिली प्लॅनिंगवर प्रश्न विचारले गेले. त्यावेळी दोघांनीही जेव्हा देवाची ईच्छा असेल,त्याची  कृपादृष्टी आमच्यावर असले तेव्हा त्या -त्या गोष्टी आमच्या आयुष्यात येतील असे सांगत वेळ मारून नेली. इतकेच नाही तर पुढे बिपाशा म्हणाली की, काही समस्येमुळे मी आई बनणार नसेल तर आम्ही बाळाला दत्तकही घेवू शकतो. यावर आम्ही ठाम आहोत. आम्हाला बाळाला दत्तक घेण्यात काहीच प्रॉब्लेम नाही.

देशात बरीच मुले आहेत ज्यांना आपल्यासारख्या लोकांची गरज आहे. अशी अनेक मुले आहेत ज्यांना कोणत्याही प्रकारचा आनंद मिळत नाही. अशा मुलांना मदत करणे आणि त्यांना दत्तक घेत त्यांच्या आयुष्यात सुक्षाचे आनंदाचे क्षण निर्माण करणे हे आपले कर्तव्य असल्याचे तिने सांगितले. आपण नक्कीच गरजू मुलांच्या मदतीसाठी पुढे आले पाहिजे. ही आपल्या सर्वांची जबाबदारी बनते. भविष्यात काय होते ते पाहूया.

गेल्या 4 वर्षात बिपाशा प्रेग्नंट असल्याच्या अनेकदा अफवा पसरल्या होत्या. एकदा तर बिपाशा इतरी वैतागली की , तिला सोशल मीडियाद्वारे प्रेग्नंसीची बातमी अफवा असल्याचे सांगावे लागले होते. काही वर्षांपूर्वी बिपाशाला विचारले होते की तिला मुले आवडतात का? या प्रश्नावर बिपाशा म्हणाली की करण आणि मला दोघेही मुलं आवडतात, पण आत्ता आम्हाला एकमेकांना वेळ द्यायचा आहे. 

टॅग्स :बिपाशा बासूकरण सिंग ग्रोव्हर