बॉलिवूड स्टार बिपाशा बसू (Bipasha Basu) आणि करण सिंग ग्रोव्हर 2022 मध्ये एका मुलीचे पालक झाले आहेत. बिपाशा बसूने नोव्हेंबरमध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला आणि तिचे नाव देवी ठेवलं आहे. बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर आपल्या लाडक्या देवीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. चाहते ही तिच्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत असतात. आता बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांनी देवीचं अन्नप्राशन सोहळा साजरा केला आणि तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.
बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हरने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की,या जोडप्याने त्यांची मुलगी देवीचा अन्नप्राशन सोहळा बंगाली रितीरिवाजांनुसार साजरा केला आहे. बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांची मुलगी देवीचा अन्नप्राशन सोहळा आनंदात पार पडला. बंगाली लूकमध्ये आई-मुलगी खूपच सुंदर दिसत होती.
2016 मध्ये बिपाशा व करण यांनी लग्नगाठ बांधली होती. अभिनेत्री असण्यासोबतच बिपाशा एक डिझाईनरही आहे. बिपाशाचा शूज, कपडे आणि होम डेकोरेशनचा बिझनेस आहे. 1996 पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. 2001 मध्ये ‘अजनबी’ या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
‘अलोन’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बिपाशा आणि करण पहिल्यांदा भेटले होते.त्याचेवळी दोघांची चांगली मैत्री झाली. बघता-बघता त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासूची कायमच चर्चा असते. रेशीमगाठीत अडकल्यापासून ही जोडी कायमच या ना त्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरते.