बिपाशा बासू (Bipasha Basu ) लवकरच आई होणार आहे. बिपाशा व करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover) दोघंही आपल्या बाळाच्या आगमनाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. अशात दोघांचा एक फोटो व्हायरल झाला आणि चाहत्यांनी कपलवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला. तुम्हीही बिपाशाला शुभेच्छा देऊ इच्छित असाल तर जरा थांबा....! कारण हा व्हायरल फोटो जुना आहे.
होय, सध्या सोशल मीडियावर बिपाशा व करणचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. यात करण सिंग ग्रोव्हरच्या हातात छोटसं बाळ आहे आणि बिपाशा त्याच्यासोबत पोझ देताना क्यूट हसताना दिसतेय. हा फोटो व्हायरल झाला आणि बिपाशा आई झाल्याचं समजून चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला. पण फोटोतील बाळ बिपाशा व करणचं नसून हा फोटो जुना आहे. हा फोटो 2019 सालचा आहे. 2019 मध्ये करणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत करणने विवान भटेना याला टॅग केलं होतं. कारण फोटोतील बेबी विवानचा होता.
गेल्या अनेक दिवसांपासून बिपाशा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा होत्या. अखेर काही दिवसांपूर्वीच बिपाशाने अधिकृतपणे ती आई होणार असल्याची घोषणा केली होती. 2016 मध्ये बिपाशा व करण यांनी लग्नगाठ बांधली होती. अभिनेत्री असण्यासोबतच बिपाशा एक डिझाईनरही आहे. बिपाशाचा शूज, कपडे आणि होम डेकोरेशनचा बिझनेस आहे. 1996 पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. 2001 मध्ये ‘अजनबी’ या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ‘अलोन’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बिपाशा आणि करण पहिल्यांदा भेटले होते.त्याचेवळी दोघांची चांगली मैत्री झाली. बघता-बघता त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासूची कायमच चर्चा असते. रेशीमगाठीत अडकल्यापासून ही जोडी कायमच या ना त्या कारणामुळे चचेर्चा विषय ठरते. विशेषत: तिसरं लग्न केल्याने करण सिंगला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केलं जातं.