Join us

लाडक्या लेकीसोबत दुर्गापुजेसाठी गेले बिपाशा- करण, देवीच्या क्युटनेसवर नेटकरी झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 4:31 PM

व्हिडीओमध्ये करणने आपल्या लाडक्या परीला कडेवर उचलून घेतलं आहे.

बंगालमध्ये नवरात्रीच्या दिवसात दुर्गापुजेला अनन्य साधारण महत्त्व असते. त्यातही दुर्गाष्टमीचा दिवस विशेष महत्त्वाचा असतो. म्हणूनच बॉलीवूडच्या अनेक सौंदर्यवती या दिवशी दुर्गापुजेच्या दर्शनाला आवर्जून जातात. बंगाली ब्यूटी सुश्मिता सेन, काजोल, राणी मुखर्जी आणि बिपाशा बासूपर्यंत सगळ्याजणी  दुर्गा पुजेत सहभागी झाल्या होत्या. बिपाशा बासून आणि करण सिंग ग्रोवर यादरम्यान लाडकी लेक देवीसोबत दुर्गामंडालमध्ये दिसल्या.   

सोशल मीडियावर बिपाशा आणि करण सिंग ग्रोवरचा लेक देवीसोबतचा व्हिडीओ व्हायरल होतोय. करणने आपल्या लाडक्या परीला कडेवर उचलून घेतलं आहे. बिपाशा तिच्यासोबत मस्ती करताना दिसतेय. यादरम्यान चिमुकली देवी घागरा चोलीमध्ये खूपच क्युट दिसतेय. नेटकरीही तिच्या क्युटनेसवर फिदा झालेत.   

बिपाशाने या दरम्यान हिरव्या रंगाची साडी परिधान केलेली दिसतेय, केसात गजरा माळून तिने आपला लूकपूर्ण केला आहे. यादरम्यान करणने सफेद कलरचा कुर्ता पायजामा घातला आहे. बिपाशाचा हा दुर्गा पूजेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.   

 

 बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोवर अनेकदा इन्स्टाग्रामवर त्यांच्या मुलीची गोंडस झलक शेअर करत असतात. ‘अलोन’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बिपाशा आणि करण पहिल्यांदा भेटले होते. त्याचेवळी दोघांची चांगली मैत्री झाली. बघता-बघता त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.  

टॅग्स :बिपाशा बासू