बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर दिसणार या चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 4:55 AM
बॉलिवूड बंगाली ब्युटी गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण आता लवकरच ती चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे. ...
बॉलिवूड बंगाली ब्युटी गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण आता लवकरच ती चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे. ऐवढेच नाही तर तिच्यासोबत पती करण सिंग ग्रोव्हरसुद्धा झळकणार आहे. जवळपास तीनवर्षांपासून बिपाशाला या चित्रपटाची कथा आवडली आहे. तिने काम करण्यासाठी होकार दिला आहे. बिपाशा बासू आणि करण सिंग्र ग्रोव्हरला दिग्दर्शक अंकुशची कथा आवडली आहे. या चित्रपटाचे नाव फिरकी ठेवण्यात आले आहे. या चित्रपटाचा जॉनर कॉमेडी असणार आहे. बिपाश आणि करणचा हा चित्रपट पुढच्या वर्षी फ्लोअरवर येणार आहे. त्यामुळे बिपाश आणि करणचे फॅन्स या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतील यात काही शंका नाही. सध्या करण आणि बिपाशा त्यांच्या कंडोमच्या जाहिरातीमुळे चर्चेत आहेत. अत्यंत सेक्सी आणि हॉट अंदाजात ही जाहिरात करण्यात आली आहे. मात्र या जाहिरातीमुळे नाही तर वेगळ्या गोष्टीमुळे रसिकांनी बिप्सला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या जाहिरातीची माहिती, फोटो बिपाशा कायमच सोशल मीडियावर शेअर करत असते. याबाबत कधी बिपाशाचं कौतुक होतं किंवा कधी कंडोमसारख्या जाहिराती केल्यामुळे तिला फॅन्सच्या नाराजीचा सामना करावा लागतो. तर काही दिवसांपूर्वी करण व बिपाशाने एका बेडिंग एक्सेसिरीजच्या जाहिरातीचे शूट केले. पण हे जाहिरात करताना दोघांनी दुप्पट वेळ घेतला. कारण मऊशार गादीची जाहिरात करता करता दोघेही चक्क झोपी गेले. हे खरे आहे का? असे बिपाशाला विचारले गेले. यावर तिने होकारार्थी उत्तर दिले. बिपाशा म्हणाली की, होय, ही जाहिरात करायला आम्हाला दुप्पट वेळ लागला. कारण जाहिरात करता करता आम्ही खरच झोपी गेलो होतो. शेड्यूल इतके बिझी असते की, झोपायला वेळच मिळत नाही. त्यामुळे शूटदरम्यान आम्हाला डोळे बंद करायला सांगितले गेले अन् आम्ही चक्क झोपी गेलो. आम्ही किती रिअॅलिस्टिक अॅक्टिंग करतोय, असेच आमच्या दिग्दर्शकाला वाटले. पण त्याला काय माहित, की आम्ही जाम थकलेलो होतो.ALSO READ : दिवाळी पार्टीत एक्स-बॉयफ्रेन्डला समोर पाहून अशी झाली बिपाशा बासूची अवस्था!!