Join us

Coronavirus: हॉस्पिटलमधून पळाले कोरोना व्हायरसचे रुग्ण, खूप भडकले बिपाशा बासू आणि रितेश देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 11:29 AM

कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण हॉस्पिटलमधून पळून जात असल्याच्या वृत्तावर बिपाशा व रितेश यांनी रिएक्शन दिली आहे.

जगभरात कोरोना व्हायरसचं सावट असल्यामुळे भीतीचं वातावरण आहे. भारतात आतापर्यंत कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या 116 पर्यंत पोहचली आहे. कोरोना व्हायरसच्या बाबतीत बॉलिवूडचे सेलिब्रेटी खूप गांभीर्याने पाहत आहे. यादरम्यान असे वृत्त येत आहे की कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण हॉस्पिटलमधून पळत आहेत. ज्यामुळे बाकीच्या लोकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. या वृत्तावर नुकतीच रितेश देशमुखबिपाशा बासू यांनी रिएक्शन दिली आहे.

बिपाशा बासूने ट्विट करत लिहिले की, लोक इतके गैरजबाबदार कसे काय होऊ शकतात. एक नागरिक असल्यामुळे आपल्याला जागरूक असले पाहिजे आणि गैरजबाबदार वागलं नाही पाहिजे. आपल्याला आपल्या सरकारला सहकार्य केले पाहिजे. जेणेकरून आपण या परिस्थितीतून बाहेर पडू.

तर रितेश देशमुखने म्हटलं की, हे खूपच गैरजबाबदार वर्तणूक आहे. सरकार व मेडिकल प्रशासनाला तुमची मदत करू द्या. जर तुम्ही स्वतःला वेगळं ठेवाल तर तुमचे मित्र, कुटुंब आणि इतर लोक सुरक्षीत राहतील. आपण सगळे सैनिक आहोत, आपल्या सगळ्यांना याच्यासोबत लढलं पाहिजे, भारताने एकत्रित आले पाहिजे (इंडिया युनाइटेड).

महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोना व्हायरसची लागण झालेली प्रकरणं समोर आले आहेत. राज्य सरकारने काही मुख्य धार्मिक व पर्यटन स्थळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की औरंगाबादमधील प्रसिद्ध अजिंठा लेणी व एलोका गुंफा, मुंबईतील प्रसिद्ध देवस्थान सिद्धीविनायक मंदिर व उस्मानाबादमधील तुळजाभवानी मंदिर बंद ठेवण्यात आले आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यारितेश देशमुखबिपाशा बासू