ठळक मुद्दे‘वो कौन थी’मध्ये मनोज कुमार आणि डबल रोलमध्ये साधना होती. एन.एन. सिप्पी प्रॉडक्शनच्या या सिनेमाचे दिग्दर्शन राज खोसला यांनी केले होते. त्यातील सस्पेन्स, थ्रील आणि संगीत अजूनही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.
बंगाली बाला बिपाशा बासू दीर्घकाळापासून इंडस्ट्रीतून गायब आहे. मध्यंतरी ‘वो कौन थी’ या गाजलेल्या चित्रपटाच्या रिमेकसाठी बिपाशा दिसणार अशी बातमी होती. पण ताजी बातमी खरी मानाल तर आता हा चित्रपटही बंद पडला आहे.फसवणुकीच्या प्रकरणात निर्माती प्रेरणा अरोराच्या अटकेनंतर प्रेरणाच्या सहका-यांनी ‘वो कौन थी’च्या रिमेकचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी प्रचंड खटाटोप केला. पण या हक्कांच्या मोबदल्यात या लोकांनी देऊ केलेल्या करारातील अटी पूर्ण झाल्या नाहीत आणि ‘वो कौन थी’च्या रिमेकला ग्रहण लागले. ताजी बातमी खरी मानाल तर ‘वो कौन थी’च्या ओरिजनल मेकर्सनी या रिमेकचे हक्क परत घेतले आहेत.
निर्माता एन एन सिप्पींचा ‘वो कौन थी’ हा हिंदी सिनेमा क्लासिक सिनेमा म्हणून ओळखला जातो. गतवर्षी प्रेरणा अरोराने या चित्रपटाच्या रिमेकचे हक्क खरेदी केले होते. या रिमेकमध्ये साधनाची भूमिका ऐश्वर्या राय बच्चन साकारणार, हेही ठरले होते. पण याचदरम्यान प्रेरणा व ऐश्वर्यात कुठल्याशा कारणावरून मदभेद निर्माण झालेत आणि ऐश्वर्याने या चित्रपटातून अंग काढून घेतले. ऐश्वर्याने चित्रपट सोडल्यानंतर प्रेरणाने या चित्रपटासाठी बिपाशाचे नाव फायनल केले. एका क्लासिक चित्रपटाच्या रिमेकमधून बॉलिवूड वापसी होणार म्हटल्यावर बिपाशा चांगलीच सुखावली. तिने या चित्रपटासाठी गृहपाठही सुरु केला. पण प्रेरणाच्या अटकेनंतर तिचा एक एक प्रोजेक्ट धडाधड बंद पडलेत. दुदैवाने ‘वो कौन थी’चा रिमेकही अडकला आणि बिपाशाच्या बॉलिवूड पुनरागमनाचे स्वप्नही भंगले.
२०१५ मध्ये आलेला ‘अलोन’ हा बिपाशाचा अखेरचा चित्रपट होता. तेव्हापासून बिपाशा एकाही चित्रपटात दिसली नाही. जुन्या ‘वो कौन थी’मध्ये मनोज कुमार आणि डबल रोलमध्ये साधना होती. एन.एन. सिप्पी प्रॉडक्शनच्या या सिनेमाचे दिग्दर्शन राज खोसला यांनी केले होते. त्यातील सस्पेन्स, थ्रील आणि संगीत अजूनही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.