बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू ( Bipasha Basu ) दीर्घकाळापासून मोठ्या पडद्यावर झळकलेली नाही. पण म्हणून तिची चर्चा कमी नाही. बिपाशा सध्या चर्चेत आहे ती प्रेग्नंसीच्या बातम्यांमुळे. होय, याआधी अनेकदा बिपाशा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा होत्या. पण दरवेळ त्या अफवा ठरल्या. आता पुन्हा एकदा बिपाशाच्या प्रेग्नेंसीच्या अफवांनी जोर पकडला आहे. याला कारण आहे, बिपाशाचा व्हिडीओ.
होय, नुकतीच बिपाशा पती करण सिंग ग्रोव्हर व तिच्या कुटुंबासह डिनर आउटिंग करताना दिसली. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने याचा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी बिपाशा निळ्या रंगाचा ओव्हरसाइज्ड ड्रेस परिधान केला होता.
तिचा हा व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी बिपाशा प्रेग्नंट असल्याचा अंदाज बांधायला सुरुवात केली. ती निश्चितपणे गर्भवती आहे... मम्मी ग्लोपासून ते मोठ्या आकाराच्या शर्टपर्यंत..., अशी कमेंट एका युजरने दिली. यावर, मलाही वाटते, ती गर्भवती आहे, अशी कमेंट अन्य एका युजरने केली. बेबी बम्प लपवण्यासाठी बिपाशाने ओव्हरसाईज्ड ड्रेस घातल्याचं तर्क अनेक चाहत्यांनी दिला.
याआधी 2019 साली सुद्धा बिपाशा प्रेग्नंट असल्याचा अंदाज बांधला गेला होता. बिपाशा व करण रमेश तौरानीच्या दिवाळी पार्टीत सहभागी झाले होते, तेव्हा अभिनेत्रीच्या लूकने तिच्या गर्भधारणेच्या अफवांना हवा दिली होती. या पार्टीचे फोटो फोटो समोर येताच, बिपाशा गर्भवती आहे आणि ती तिच्या दुपट्ट्याने तिचा बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं चाहत्यांनी म्हटलं होतं. 2016 मध्ये बिपाशा व करण यांनी लग्नगाठ बांधली होती.