Bipasha Basu Baby Name: बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover) हे बॉलिवूडच्या पॉवर कपलपैकी एक कपल. काल बिपाशा व करण दोघंही आई-बाबा झालेत. लग्नाच्या सहा वर्षानंतर दोघांच्या घरी एक गोंडस कन्यारत्न जन्मास आलं. घरी ‘लक्ष्मी’ आल्यानं बिप्स आणि करण दोघंही जाम खूश्श आहेत. चाहतेही आनंदात आहेत. सध्या या कपलवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. चाहते बिपाशा आणि करणच्या लेकीची झलक पाहण्यासाठी आतूर आहेत. बिपाशा व करणने आपल्या लेकीचं नाव काय ठेवलं, हे जाणून घेण्याचीही उत्सुकता आहे. तर आता या जोडप्यानं मुलीच्या नावाचा खुलासा केला आहे. मुलीच्या जन्मानंतर बिपाशाने पहिली पहिली पोस्ट करत मुलीचं नाव सांगितलं आहे. बिपाशाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लेकीच्या पायाचा फोटो शेअर केला आहे. हा आम्हाला मिळालेला आशीर्वाद असल्याचं तिने म्हटलं आहे.
मुलीच्या जन्माची तारीख 12-11-22 असं लिहित तिने मुलीच्या नावाचा खुलासा केला आहे. ‘देवी बासू सिंग ग्रोव्हर’ असं तिने या फोटोवर लिहिले आहे. म्हणजेच, बिपाशाने आपल्या लेकीचं नाव देवी ठेवलं आहे. ‘तुमच्या प्रेमाचे आणि देवीच्या आशीवार्दाचं प्रत्यक्ष रुप इथे आहे. ते फारच सुंदर आहे,’ असं तिने म्हटलं आहे.
2016 मध्ये बिपाशा व करण यांनी लग्नगाठ बांधली होती. बिपाशा आणि करण सिंग ग्रोव्हरची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. ‘अलोन’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बिपाशा आणि करण पहिल्यांदा भेटले होते.त्याचेवळी दोघांची चांगली मैत्री झाली. बघता-बघता त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासूची कायमच चर्चा असते. रेशीमगाठीत अडकल्यापासून ही जोडी कायमच या ना त्या कारणामुळे चचेर्चा विषय ठरते. विशेषत: तिसरं लग्न केल्याने करण सिंगला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केलं जातं. पण हे कपल एकमेकांसोबत आनंदी आहे.