बॉलीवूडची बोल्ड अँड ब्युटीफूल अभिनेत्री बिपाशा बासू आता आई झाली आहे. बिपाशा आणि करण यांना कन्यारत्न प्राप्त झालं आहे. बिपाशाच्या गोड बातमीनंतर बॉलीवूडमधील अनेक कलाकार तिचं अभिनंदन करत आहेत. तर बॉलीवूडमधील आणखी एका कपलनं बिपाशाच्या लेकीसाठी छानसं गिफ्ट पाठवलं आहे.
बिपाशानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीज रविवारी अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांच्याकडून तिला आणि तिचा अभिनेता पती करण सिंग ग्रोव्हर यांच्या चिमुकल्या 'देवी'ला मिळालेल्या गोड सरप्राईजची झलक शेअर केली. बिपाशानं सोशल मीडिया हँडलवर ती आई बनल्याची बातमी शेअर केली होती. तसंच आपल्या लेकीच्या चिमुकल्या पायांचा फोटो पोस्ट करत तिचं नाव 'देवी' ठेवल्याचंही जाहीर केलं होतं.
सोनमनं पाठवलेल्या सरप्राईजचा एक फोटो बिपाशाने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 'देवी'साठी पाठवलेली लहान निळ्या रंगाची टोपी आणि खेळणी यांसारख्या भेटवस्तू भरलेलं एक बास्केट यात दिसून येत आहे. बास्केटला गुलाबी-पांढरे रंगाचे फुगेही आहेत. फुग्यांवर 'बेबी गर्ल' असं लिहिलेलं दिसून येतं. देवीला मिळालेलं हे सुंदर गिफ्ट पाहून बिपाशा आणि करण देखील भारावले. बिपाशानं सोनम आणि तिच्या पतीचे आभार व्यक्त करत 'देवी'लाही हे गिफ्ट आवडल्याचं म्हटलं आहे.