Join us

Bipasha Basu Baby: हॅलो वर्ल्ड, मी देवी...! बिपाशा बासूने पहिल्यांदा दाखवला लेकीचा चेहरा, शेअर केला क्यूट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2023 10:21 AM

Bipasha Basu Karan Singh Grover Daughter Devi : “हॅलो वर्ल्ड, मी देवी” असं कॅप्शन देत बिप्सने देवीचा सुंदर फोटो शेअर केला आहे. 

Bipasha Basu Karan Singh Grover Daughter Devi :   बलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू लग्नानंतर ६ वर्षांनी आई झाली. काही महिन्यांपूर्वी गेल्या १२ नोव्हेंबरला तिने गोंडस मुलीला जन्म दिला. बिपाशा व करण सिंग ग्रोव्हर कन्येच्या आगमनाने सुखावले. देवी  त्यांनी आपल्या लेकीचं नाव देवी बासू सिंग ग्राेव्हर असं तिचं नामकरण झालं. खरं तर बिपाशाची लेक कुणावर गेलीये, कशी दिसते, हे पाहण्यासाठी चाहते आतुर होते. पण बिपाशाने जाणीवपूर्वक आपल्या लेकीचा चेहरा लपवून ठेवला. पण आता बिपाशाने देवीचा एक सुंदर फोटो शेअर केलाये.   बिपाशाने पहिल्यांदाच लेकीचे फोटो शेअर केल्याचं पाहून चाहते क्रेझी झाले आहेत.फोटोत चिमुकली देवीने गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला आहे. त्याला मॅचिंग असा हेअरबँड लावला आहे आणि ती क्यूट हसतेय. “हॅलो वर्ल्ड, मी देवी” असं कॅप्शन देत बिप्सने हा गोंडस फोटो पोस्ट केला आहे. 

बिपाशाने हा फोटो शेअर करताच चाहत्यांनी त्यावर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला.2016 मध्ये बिपाशा व करण यांनी लग्नगाठ बांधली होती. अभिनेत्री असण्यासोबतच बिपाशा एक डिझाईनरही आहे. बिपाशाचा शूज, कपडे आणि होम डेकोरेशनचा बिझनेस आहे. 1996 पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. 2001 मध्ये ‘अजनबी’ या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

‘अलोन’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बिपाशा आणि करण पहिल्यांदा भेटले होते.त्याचेवळी दोघांची चांगली मैत्री झाली. बघता-बघता त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासूची कायमच चर्चा असते. रेशीमगाठीत अडकल्यापासून ही जोडी कायमच या ना त्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरते. 

टॅग्स :बिपाशा बासूकरण सिंग ग्रोव्हरबॉलिवूड