Join us

Bipasha Basu Baby: मुलगी झाली हो...! आलियानंतर बिपाशा बासू झाली आई, अभिनेत्रीवर चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 2:54 PM

Bipasha Basu-Karan Singh Grover Welcomes Baby Girl: बिपाशा बासू (Bipasha Basu) व करण सिंग ग्रोव्हर( Karan Singh Grover)आईबाबा झाले आहेत.

Bipasha Basu-Karan Singh Grover Welcomes Baby Girl:

Bipasha Basu-Karan Singh Grover Welcomes Baby Girl: बिपाशा बासू (Bipasha Basu) व करण सिंग ग्रोव्हर( Karan Singh Grover)आईबाबा झाले आहेत. आज  बिपाशा बसूने एका गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला. आई व तिच्या चिमुकलीची प्रकृती उत्तम असल्याचं कळतंय. सध्या बिपाशा  व करण सिंग ग्रोव्हरवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. बाळाच्या आगमनाने कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ही गोड बातमी ऐकून चाहतेही क्रेझी झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, हे कपल शनिवारी एका मुलीचे आई-बाबा झाले. 2016 मध्ये बिपाशा आणि करणचे लग्न झाले होते. लग्नाच्या 6 वर्षानंतर या आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं आहे.

2016 मध्ये बिपाशा व करण यांनी लग्नगाठ बांधली होती. अभिनेत्री असण्यासोबतच बिपाशा एक डिझाईनरही आहे. बिपाशाचा शूज, कपडे आणि होम डेकोरेशनचा बिझनेस आहे. 1996 पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. 2001 मध्ये ‘अजनबी’ या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ‘अलोन’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बिपाशा आणि करण पहिल्यांदा भेटले होते.त्याचेवळी दोघांची चांगली मैत्री झाली. बघता-बघता त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासूची कायमच चर्चा असते. रेशीमगाठीत अडकल्यापासून ही जोडी कायमच या ना त्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरते.

टॅग्स :बिपाशा बासूकरण सिंग ग्रोव्हर