बॉलिवूडमधून आणखी एक गुडन्यूज आहे. होय, बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu ) प्रेग्नंट आहे. काही मिनिटांपूर्वी बिपाशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही गोड बातमी शेअर केली. बिपाशा व तिचा पती करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover) आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. आज या जोडप्याने याबाबतची अधिकृत घोषणा केली.
बिपाशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पतीसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. यात बिपाशाचा बेबी बम्प स्पष्ट दिसतोय. या फोटोंसोबत बिपाशाने सुंदर पोस्टही शेअर केली आहे.
‘आम्ही या आयुष्याची सुरूवात केली...आम्ही एकमेकांना भेटलो, तेव्हापासून आम्ही दोघं होतं. आमच्यात प्रचंड प्रेम होतं. आता लवकरच आम्ही दोनाचे तीन होणार आहोत. आमच्या प्रेमाचं प्रतिक आमचं बाळ लवकरच आमचा आनंद द्विगुणित करणार आहे,’ असं बिपाशाने या पोस्टसोबत लिहिलं आहे.बिपाशा व करणच्या लग्नाला 6 वर्षे झाली आहेत आणि 6 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर या कपलच्या घरी पाळणा हलणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून बिपाशा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा होत्या. याआधी 2019 साली सुद्धा बिपाशा प्रेग्नंट असल्याची चर्चा होती. बिपाशा व करण रमेश तौरानीच्या दिवाळी पार्टीत सहभागी झाले होते, तेव्हा अभिनेत्रीच्या लूकने तिच्या गर्भधारणेच्या अफवांना हवा दिली होती. या पार्टीचे फोटो फोटो समोर येताच, बिपाशा गर्भवती आहे आणि ती तिच्या दुपट्याने तिचा बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं चाहत्यांनी म्हटलं होतं.पण ही अफवा निघाली होती. 2016 मध्ये बिपाशा व करण यांनी लग्नगाठ बांधली होती. अभिनेत्री असण्यासोबतच बिपाशा एक डिझाईनरही आहे. बिपाशाचा शूज, कपडे आणि होम डेकोरेशनचा बिझनेस आहे. 1996 पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. 2001 मध्ये ‘अजनबी’ या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
बिपाशा करणची लव्हस्टोरीबिपाशा आणि करण सिंग ग्रोव्हरची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. ‘अलोन’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बिपाशा आणि करण पहिल्यांदा भेटले होते.त्याचेवळी दोघांची चांगली मैत्री झाली. बघता-बघता त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासूची कायमच चर्चा असते. रेशीमगाठीत अडकल्यापासून ही जोडी कायमच या ना त्या कारणामुळे चचेर्चा विषय ठरते. विशेषत: तिसरं लग्न केल्याने करण सिंगला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केलं जातं.