Bipasha Basu Pregnant : बॉलिवूडमधून आणखी एक गुडन्यूज ऐकायला मिळतेय. होय, बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu ) प्रेग्नंट असल्याची चर्चा आहे. चर्चा खरी मानाल तर बिपाशा व तिचा पती करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover) आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. हे जोडपं लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा करू शकतं.
बिपाशा व करणच्या लग्नाला 6 वर्षे झाली आहेत आणि 6 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर या कपलच्या घरी पाळणा हलणार आहे. ‘पिंकविला’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, लवकरच कपल ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर करणार आहे. अद्याप दोघांपैकी कुणीही अधिकृतपणे या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
याआधी 2019 साली सुद्धा बिपाशा प्रेग्नंट असल्याची चर्चा होती. बिपाशा व करण रमेश तौरानीच्या दिवाळी पार्टीत सहभागी झाले होते, तेव्हा अभिनेत्रीच्या लूकने तिच्या गर्भधारणेच्या अफवांना हवा दिली होती. या पार्टीचे फोटो फोटो समोर येताच, बिपाशा गर्भवती आहे आणि ती तिच्या दुपट्याने तिचा बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं चाहत्यांनी म्हटलं होतं.पण ही अफवा निघाली होती. 2016 मध्ये बिपाशा व करण यांनी लग्नगाठ बांधली होती.
अभिनेत्री असण्यासोबतच बिपाशा एक डिझाईनरही आहे. बिपाशाचा शूज, कपडे आणि होम डेकोरेशनचा बिझनेस आहे. 1996 पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. 2001 मध्ये ‘अजनबी’ या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
बिपाशा - करणची लव्हस्टोरी बिपाशा आणि करण सिंग ग्रोव्हरची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. ‘अलोन’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बिपाशा आणि करण पहिल्यांदा भेटले होते.त्याचेवळी दोघांची चांगली मैत्री झाली. बघता-बघता त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासूची कायमच चर्चा असते. रेशीमगाठीत अडकल्यापासून ही जोडी कायमच या ना त्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरते. विशेषत: तिसरं लग्न केल्याने करण सिंगला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केलं जातं.