बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोवर हे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. बिपाशाने सध्या बॉलिवूडमध्ये काम करणं कमी केलं असून ती संपूर्णतः संसारात लक्ष देतेय. या दोघांचे लग्न 2016 मध्ये झाले होते. बिपाशा आणि करण गेल्या वर्षी 2022 च्या नोव्हेंबरमध्ये आई - बाबा झाले. या दोघांच्या मुलीचे नाव बसु सिंह ग्रोवर ठेवलंय. आज त्यांच्या मुलगी 10 महिन्याची झाली आहे. बिपाशाने मुलीचा क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय.
बिपाशाने शेअर केलेल्या व्हिडीत देवी पिंक फ्रॉकमध्ये खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत आहे बिपाशाने लिहिले, 'आमचे बाळ आज 10 महिन्यांचं झालं.' सोशल मीडियावर चाहत्यांनी देवीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोवर अनेकदा इन्स्टाग्रामवर त्यांच्या मुलीची गोंडस झलक शेअर करत असतात. बिपाशाने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, देवीचा जन्म झाला तेव्हा तिला वेन्ट्रिकुलर सेप्टल डिफेक्ट (वीएसडी) हा आजार होता. तिच्या हृदयात दोन छेद होते आणि तेव्हा ती जवळपास तीन दिवसांची होती. देवी तीन महिन्यांची असताना त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ऑपरेशन सहा तास चालले. जेव्हा देवी ऑपरेशन थिएटरमध्ये होती तेव्हा माझं आयुष्य थांबलं होतं.
अभिनेत्री असण्यासोबतच बिपाशा एक डिझाईनरही आहे. बिपाशाचा शूज, कपडे आणि होम डेकोरेशनचा बिझनेस आहे. 1996 पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. 2001 मध्ये ‘अजनबी’ या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ‘अलोन’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बिपाशा आणि करण पहिल्यांदा भेटले होते. त्याचेवळी दोघांची चांगली मैत्री झाली. बघता-बघता त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.