बॉलिवूडची अभिनेत्री दिशा पाटनीने अल्पावधीतच आपल्या क्युटनेसच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. ती सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. तिचा प्रत्येक लूक हा घायाळ करणारा ठरतो. दिशा पाटनीचा आज आपला वाढदिवस साजरा करते आहे. दिशा पाटनीचा जन्म 13 जून 1992 रोजी उत्तराखंडच्या पिथौरागढमध्ये झाला. पुढे दिशा उत्तर प्रदेशातील बरेली येथे कुटुंबासोबत राहू लागली. तिच्या वडिलांचे नाव जगदिश सिंह पटानी आहे. ते डीएसपी अधिकारी होते.
दिशाची एक मोठी बहीण आहे तिचं नाव खुशबू पाटनी. दिशा पाटनी एमिटी यूनिवर्सिटी, नोएडा येऊन इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरींगमधून पदवीचं शिक्षण घेतलं आहे. दिशा पाटनीने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. तिने 2013 मध्ये पॉन्ड्स फेमिना मिस इंडियामध्ये भाग घेतला,यास्पर्धेत ती फर्स्ट रनरअप ठरली. यानंतर दिशाची ओळख वाढली.
दिशाने सिनेमातील करिअरची सुरुवात २०१५ मध्ये दक्षिण भारतातील प्रसिद्ध दिग्दर्शक जगन्नाथ पुरी यांचा सिनेमा लोफरपासून केली होती. ज्याठिकाणी ते वरूण तेजसोबत दिसली. या सिनेमात तिने हैदराबादमधील एका मुलीची भूमिका साकारली. त्यानंतर दिशाच्या करिअरमध्ये काही विशेष बदल झाला नाही.
दिशा पटानीला २०१६ भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंग धोनी यांच्या बायोपिक सिनेमा 'एम एस धोनी: द अनटॉल्ड स्टोरी' काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमात महेंद्र सिंग धोनची पहिली प्रेयसी प्रियंका हिची भूमिका तिने केली होती. या सिनेमात ती सुशांत सिंह राजपूतसोबत दिसली होती. दिशा पटानी हिला धोनी एन अनटोल्ड स्टोरी या सिनेमासाठी स्क्रीन अवार्डमध्ये बेस्ट डेब्यू या पुरस्काराने सन्मानित केले होते.
माहितीनुसार दिशा मुंबईत केवळ ५०० रुपये घेऊन आली होती. ती म्हणते की, मी एकटी राहत होती. काम करत होती परंतु कधीही कुटुंबाकडे मदत मागितली नाही. दिशाने मुंबईतील वांद्रे येथे स्वत:चं घर घेतलं. २०१७ मध्ये दिशाने स्वत:लाच हे गिफ्ट दिलं होतं. दिशा पटानीच्या या घराचं नाव लिटिल हट असं आहे ज्याची किंमत ५ कोटी रुपये आहे.