Join us

माझ्या पांढऱ्या केसांकडे तर बघ...! दिलीप कुमार यांनी लाख प्रयत्न केलेत पण सायरा बानोंच्या जिद्दीपुढे नमले!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 8:00 AM

ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांचा आज वाढदिवस.

ठळक मुद्देसायरा यांनी एका मुलाखतीत एक इंटरेस्टिंग किस्सा सांगितला होता. लग्नाआधीचा.

एकेकाळी आपल्या सौंदयाने, अभिनयाने घायाळ करणारी आणि लाखो तरूणांच्या गळ्यातील असणारी चुलबुली अभिनेत्री म्हणजे सायरा बानो. सायरा बानो यांचा जन्म 23 ऑगस्ट 1944 मध्ये मसूरी येथे झाला. सायरा बानो यांचे नाव घेतले तरी सोबत दिलीप कुमारांची आठवण होते.   वाढदिवसानिमित्ताने जाणून घेऊ या  सायरा बानो आणि दिलीप कुमार  यांची लव्हस्टोरी... 

सायरा बानो यांच्या रिल लाइफ इतकेच त्यांचे रिअल लाईफही इटरेस्टिंग आहे. वयाच्या 22 व्या वर्षी सायरा त्यांच्यापेक्षा दुप्पट वयाच्या दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या होत्या.  दिलीप कुमार यांना पाहताच क्षणी, लग्न करेल तर यांच्याशीच असे सायरा यांनी ठरवले होते.

 दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची जोडी बॉलिवूडमधील सर्वात जुन्या जोड्यांपैकी एक. सायरा बानो यांनी 1966मध्ये वयाच्या  दिलीप कुमार यांच्याशी लग्नगाठ बांधली. पण त्यापूर्वी सायरा आपल्यावर जीवापाड प्रेम करते हे माहित असूनही दिलीप कुमार सायरासोबत लग्न करायला तयार नव्हते. कारण काय तर वयातील फरक़ होय,दिलीप कुमार 44 वर्षांचे होते आणि सायरा 22 वर्षांच्या. वयातील या फरकामुळे दिलीप कुमार सायरांशी लग्न करायला तयार नव्हते.   दिलीप कुमार यांनी अनेक प्रकारे त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता.   तू माझे पांढरे केस पाहिले आहेत का? अशा शब्दांत दिलीप कुमार सायरांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत होते.  पण सायरा लग्नावर अडून बसल्या होत्या. दिलीप कुमार यांनी अनेक प्रयत्न केलेत पण अखेर सायरांच्या हट्टापुढे ते नमले. दोघांचेही लग्न झाले.

लग्नाआधी म्हणाले होते, बच्ची है...सायरा यांनी एका मुलाखतीत एक इंटरेस्टिंग किस्सा सांगितला होता. लग्नाआधीचा. होय, ‘राम और श्याम’ या सिनेमात दिलीप कुमार लीड रोलमध्ये होते आणि हिरोईन म्हणून सायरा बानो यांचे नाव फायनल झाले होते. मात्र दिलीप कुमार यांनी सायरांसोबत काम करण्यास नकार दिला होता. बच्ची है, मैं इसके साथ फिल्म नहीं करूंगा, असे ते म्हणाले होते. ऐकून आश्चर्य वाटेल पण त्याचवर्षी ऑक्टोबर माहिन्यात सायरा व दिलीप कुमार यांचे लग्न झाले होते.  

टॅग्स :सायरा बानूदिलीप कुमार