birthday specail : पाहा, ‘बर्थ डे गर्ल’ शिल्पा शेट्टीची काही गाजलेली गाणी!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2017 6:38 AM
शिल्पा शेट्टी. आज ८ जून २०१७ रोजी शिल्पा ४२ वर्षांची होत आहे. पण आजही शिल्पाचे ग्लॅमर जराही कमी झालेले नाही. शिल्पाने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. पण आयटम साँग्स आणि ठुमके यासाठी ती जास्त ओळखली गेली. शिल्पाच्या अशाच काही गाण्यांवर नजर टाकूयात.
बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेकजणी डेब्यू करतात. यापैकी अनेक अभिनेत्रींच्या वाट्याला ग्लॅमर, पैसा, प्रसिद्धी असे सगळे येते आणि यानंतर अचानक त्या बॉलिवूडमधून गायब होतात. अर्थात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताहेत. पण त्यांची संख्या बोटांवर मोजण्याइतकीच. अशीच एक बॉलिवूडची ‘हसीना’ आहे, ती म्हणजे, शिल्पा शेट्टी. आज ८ जून २०१७ रोजी शिल्पा ४२ वर्षांची होत आहे. पण आजही शिल्पाचे ग्लॅमर जराही कमी झालेले नाही.शिल्पाचा जन्म ८ जून १९७५ रोजी मंगळूरू येथे झाला. मुंबईत तिचे शिक्षण झाले. शिक्षणासोबत खेळ आणि डान्स यात शिल्पाला रस होता. पुढे ती अभिनयाकडे वळली. ‘१९९३’मध्ये ‘बाजीगर’ या चित्रपटातून शिल्पाने बॉलिवूड डेब्यू केला. आत्तापर्यंत हिंदीसह तामिळ, तेलगू, कन्नडमधील सुमारे ४५ चित्रपट शिल्पाच्या नावावर आहेत. हिंदी, इंग्लिश, गुजराती, तेलगू आणि तामिळ अशा सर्व भाषा शिल्पा अगदी सहजपणे बोलते.शिल्पाच्या करिअरमध्ये एक काळ असाही आला, जेव्हा सगळे मागे सुटून जाईल की काय, असे तिला वाटले. पण याचकाळात म्हणजे २००७ मध्ये ब्रिटनच्या ‘बिग ब्रदर’ या रिअॅलिटी शोमध्ये ती दिसली. केवळ दिसली नाही तर तिने हा शो जिंकला. हा शो जिंकणारी ती पहिली भारतीय बनली. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. २२ नोव्हेंबर २००९ मध्ये शिल्पाने ब्रिटीश- इंडियन बिझनेसमॅन राज कुंद्रासोबतलग्न केले. शिल्पा राजची दुसरी पत्नी आहे. या दोघांचा वियान नावाचा एक मुलगाही आहे.शिल्पाने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. पण आयटम साँग्स आणि ठुमके यासाठी ती जास्त ओळखली गेली. शिल्पाच्या अशाच काही गाण्यांवर नजर टाकूयात.चुरा के दिल मेरा (मैं खिलाड़ी तू अनाड़ी) एक चुम्मा (छोटे सरकार) यूपी, बिहार लूटने (शूल) आईला रे लड़की मस्त मस्त (जंग ) शट अप एंड बाउंस (दोस्ताना)