Join us

BIRTHDAY SPECIAL : इरफान खानबद्दल माहित नसलेल्या ११ गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2017 10:57 AM

इरफान खानने अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:चे वेगळे असे भक्कम स्थान निर्माण केलेले आहे. मागच्या काही वर्षांमध्ये त्याच्या वैविध्यपूर्ण फिल्मोग्राफीवर ...

इरफान खानने अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:चे वेगळे असे भक्कम स्थान निर्माण केलेले आहे. मागच्या काही वर्षांमध्ये त्याच्या वैविध्यपूर्ण फिल्मोग्राफीवर नजर टाकली असता त्याच्या अभिनयाच्या रेंजची कल्पना येते. नाव घ्यायचे तर ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘पिकू’, ‘ज्युरासिक पार्क’, ‘तलवार’ आणि ‘मदारी’ या चित्रपटांची नावे पुरेसे आहेत.अशा या अष्टपैलू अभिनेत्याचा आज ५० वा वाढदिवस आहे. आज जरी इरफान खान हे नाव सर्वांच्या परिचयाचे असले तरी तो नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात होता असे नाही. बॉलीवूडमध्ये काम येऊन त्याला आता २८ वर्षे झाली आहेत. १९८८ साली त्याने हिंदी चित्रपटांत पदार्पण केले होते. परंतु खरी ओळख मिळाली ती २००० नंतरच..आज हॉलीवूड आणि बॉलीवूड अशा दोन्ही सिनेमांत आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या इरफानच्या आयुष्यातील ११ अशा गोष्टी आम्ही सांगत आहोत ज्या कदाचित तुम्हाला माहित नसतील. त्याच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त ‘सीएनएक्स मस्ती’च्या टीम कडून खूप खूप शुभेच्छा!१. इरफान खानचे खरे नाव साहबजादे इरफान अली खान असे आहे. एवढे लांबलचक नाव सिनेमांत चालणार नाही म्हणून त्याने केवळ इरफान खान असे नाव धारण केले.२. अलिकडेच त्याने त्याच्या नावात पुन्हा बदल केला. खान हे आडनाव वगळून तो केवळ इरफान असेच नाव लावणे पसंत करतो. इरफान नावातील ‘र’ या अक्षराचा उच्चार त्याला खूप आवडत असल्यामुळे नाव बदलल्याचे त्याने सांगितले.३. त्याच्या पत्नीचे नाव सुतपा सिकदर असून ते दोघे दिल्लीला राष्ट्रीय नाट्य अकादमीमध्ये शिकत असताना भेटले होते. तेथे ते एकाच वर्गात असल्याने ओळख झाली. या जोडप्याला बबिल आणि आर्यन अशी दोन मुले आहेत.४. विशेष म्हणजे ‘राष्ट्रीय नाट्य अकादमी’मध्ये (एनएसडी) त्याने खोट्या प्रमाणपत्राच्या आधारावर प्रवेश मिळवला होता.५. समीक्षक आणि प्रेक्षकांनी वाहवाह केलेला ‘द लंचबॉक्स’ हा चित्रपट ‘टोरोंटो फिल्म क्रिटिक्स असोसिएशन अवॉर्ड्स’मध्ये पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय सिनेमा आहे.६. एकेकाळी त्याच्याकडे ‘ज्युरासिक पार्क’ हा चित्रपट पाहण्यासाठीदेखील खिशात पैसे नव्हते आणि आज त्याने न केवळ त्या सिनेमात स्वत: काम केले तर अनेक हॉलीवूड सिनेमांत (द नेमसेक, लाईफ आॅफ पाय, अमेझिंग स्पायडरमॅन, स्लमडॉग मिलेनेयर) तो झळक लेला आहे.७. अमेरिकेत विमानतळावर आतापर्यंत त्याला दोनदा अडवण्यात आलेले आहे. एका दहशतवाद्याच्या नावाशी त्याच्या नावाचे साधर्म्य असल्यामुळे त्याला लॉस एंजिलिस (२००८) व न्यूयॉर्क (२००९) येथील विमानतळावर अडवण्यात आले होते.८. लहानपणापासून त्याला क्रिकेटर होण्याची इच्छा होती; पण तसे होऊ न शकल्यामुळे तो अभिनेता झाला.९. इरफानला मासांहार बिल्कुल आवडत नाही. म्हणून त्याचे वडील चेष्टेने त्याला म्हणायचे की, तो पठाणांच्या घरात जन्मलेला ब्राह्मण आहे.१०. तो लहानपणापासूनच मितभाषी आहे. लोकांशी पटकन बोलायला तो कचरतो.११. क्रिस्टोफर नोलन दिग्दर्शित ‘इंटरस्टेलर’ या सिनेमात मॅट डेमन या हॉलीवूड अभिनेत्याने केलेल्या भूमिकेसाठी आधी इरफान खानला विचारणा करण्यात आली होती; मात्र त्याने ‘द लंचबॉक्स’ आणि ‘डी-डे’ या सिनेमांना तारखा दिलेल्या असल्यामुळे त्याने तो प्रस्ताव नाकारला.