Join us

क्रिकेटपटूच्या प्रेमात वेडी होती ही अभिनेत्री; 18 वर्षांनंतर स्वत: केला होता खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 8:00 AM

एक लव्हस्टोरी...

ठळक मुद्दे1990 साली प्रदर्शित ‘बागी’ या सिनेमातून नगमाने फिल्मी करिअरची सुरुवात केली होती.

क्रिकेट आणि बॉलिवूड जगतातील रिअल लाईफ प्रेमकथा नेहमीच लक्ष वेधून घेतात. आज अशाच एका लव्हस्टोरीबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. होय, अभिनेत्री नगमा एका क्रिकेटपटूच्या प्रेमात वेडी झाली होती. खुद्द नगमाने एका मुलाखतीत या नात्याचा खुलासा केला होता. 

2000 साली सौरभ गांगुली व नगमा यांच्या अफेअरच्या चर्चा जोरात होत्या. सौरभ त्यावेळी विवाहित होता. त्यामुळे दोघांनीही या नात्यावर चुप्पी साधली. पण 2018 मध्ये म्हणजे तब्बल 18 वर्षांनंतर खुद्द नगमाने या नात्याची कबुली दिली होती. हे नाते का तुटले याचाही खुलासा तिने केला होता.

‘आम्ही दोघांनी मीडियासमोर आमच्या प्रेमाची कबुली दिली नसली, तरी सर्वांनाच आमच्या नात्याबद्दल ठाऊक होते. पण कालांतराने हे नाते संपुष्टात आले.  गांगुली करिअरच्या शिखरावर होता, त्याकाळात टीम इंडियाचा पराभव आणि कर्णधाराचा खराब परफॉर्मन्स चाहते सहन करू शकत नव्हते. याचा परिणाम आमच्या नात्यावरही झाला आणि गांगुलीने मला सोडून त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला. माझ्या मते, त्याचा निर्णय एकदम योग्य होता.  आम्ही परस्पर सहमतीने एकमेकांपासून वेगळे झालो होता. आता तो भूतकाळ झाला आहे,’असे नगमा या मुलाखतीत म्हणाली होती.

भोजपुरी अभिनेता रवी किशनसोबतही नगमाचे नाव जोडले गेले होते. अर्थात कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले. याचे कारण म्हणजे रवी किशन आधीच विवाहित होता.

1990 साली प्रदर्शित ‘बागी’ या सिनेमातून नगमाने फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. यात सलमान खान तिचा हिरो होता. पण हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. 1994 मध्ये प्रदर्शित ‘सुहाग’ या सिनेमाने नगमाला खरी ओळख दिली. यानंतर नगमाने हिंदीशिवाय भोजपुरी, तामिळ, तेलगू , कन्नड, मल्याळम, पंजाबी अशा अनेक सिनेमांत काम केले. 2007 मध्ये बॉलिवूडला रामराठ ठोकून नगमा राजकारणात रमली.

टॅग्स :बॉलिवूडसौरभ गांगुली