Birthday special : अजय देवगणने त्याच्या आईला दिले आहे, ‘हे’ वचन!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2017 4:39 AM
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याचा आज (२ एप्रिल)वाढदिवस. यानिमित्त जाणून घेऊ यात, अजयबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी...अजयने १९८५ ...
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याचा आज (२ एप्रिल)वाढदिवस. यानिमित्त जाणून घेऊ यात, अजयबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी... अजयने १९८५ मध्ये ‘प्यारी बहना’ या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारली होती. अजय चित्रपटांत आला तेव्हा त्याच्या दिसण्यावरून त्याची खिल्ली उडवली गेली होती. पण अमिताभ यांनी अजयला ‘डार्क हॉर्स’ म्हटले होते. अमिताभ यांचे शब्द अक्षरश: खरे ठरले. अजय बिग बींच्या कसोटीवर एकदम खरा उतरला. अजय देवगणचा पहिला चित्रपट होता, ‘फुल और कांटे’. अजयच्या पहिल्याच चित्रपटाला बॉक्सआॅफिसवर यश राज यांच्या ‘लम्हें’सोबत संघर्ष करावा लागला. ‘लम्हें’मध्ये अनिल कपूर व श्रीदेवी अशी हिट जोडी होती. पण अजयने या चित्रपटाला जोरदार मात दिली. कॉलेजमध्ये अजय आपल्या मित्रांसोबत दोन मोटरसायकलवर उभे राहून स्टंटबाजी करायचा. त्याचा हाच सीन्स ‘फुल और कांटे’मध्ये घेण्यात आला होता. अजयचे खरे नाव विशाल आहे. कॉलेजमध्ये त्याच्या मित्रांमध्ये तीन गँग प्रसिद्ध होत्या. दारा सिंहचा मुलगा बिंदू याची ‘बिंदू गँग’, धर्मेंन्द्र यांचा मुलगा बॉबी देओल याची ‘बॉबी गँग’ आणि अजय देवगणची ‘विशाल गँग.’ अजय मोठ मोठे इंटरव्ह्यू देणे आवडत नाही. डान्सचे म्हणाल तर हे करताना त्याच्या नाकीनऊ येते. अजयचे संपूर्ण कुटुंग दुर्गा देवीचे उपासक आहेत. अजय दरवर्षी चादर चढवायला अजमेरच्या दरग्यावरही जातो. तू कुठल्याच चित्रपटात धोकादायक स्टंट सीन्स करणार नाही, असे वचन अजयच्या आईने त्याच्याकडून घेतले आहे. त्यामुळे स्टंट सीन्स करताना अजय अतिशय सतर्क असतो. ‘फुल और कांटे’नंतर ‘प्लेटफॉर्म’, ‘संग्राम’,‘शक्तिमान’,‘कानून’ अशा अनेक चित्रपटात अजयच्या वाट्याला केवळ मारधाडीचे दृश्य आलेत. अभिनेता म्हणून त्याला कुणीच गंभीरपणे घेत नव्हते. त्यामुळे अजयने अचानक काळाची गरज ओळखून यु टर्न घेत महेश भट्ट यांचा ‘जख्म’ साईन केला. या चित्रपटात जणू अजयमधील खºया अभिनेत्याचे दर्शन घडले. ‘करण-अर्जुन’ या चित्रपटासाठी आधी शाहरूख व अजय यांची निवड झाली होती. पण दोघांनाही एकमेकांच्या भूमिका अधिक आवडल्या होत्या. अखेर कुठलाच तोडगा निघाला नाही आणि अजयने हा चित्रपट सोडला. यानंतर त्याच्याजागी या चित्रपटात सलमानची वर्णी लागली.अजयला फिल्मी पार्टी, अवार्ड्स शो आवडत नाही. काम संपले की तो घरी परततो. पार्ट्यांपेक्षा त्याला मुलांसोबत वेळ घालवणे अधिक आवडते. अजय देवगणच्या आयुष्यात सर्वातआधी आलेली अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर होती. करिश्मा आणि अजय यांची जोडी हिट असल्याचं प्रेक्षकांनीही मान्य केलं होतं. त्यावेळी अजय करिश्माला डेट करत होता. मात्र, करिश्मा कपूर आणि अजय देवगण यांचं नात फार काळ टिकू शकलं नाही. अजय देवगणच्या आयुष्यात आलेली दुसरी अभिनेत्री म्हणजे रवीना टंडन. रवीना टंडन आणि अजय देवगन यांचं नातं खुपवेळ टिकलं होतं. अजय आणि रवीना यांचे एकत्रित आलेले सिनेमेसुद्धा खुप हिट ठरले होते. अजय देवगण रविना यांच्या नात्यात दूरावा आल्यानंतर अजयच्या आयुष्यात आली ती म्हणजे अभिनेत्री काजोल. अभिनेत्री काजोल ही अजयची पत्नी. चित्रपटाच्या सेटवर अजय आणि काजोलच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली होती. आमच्या दोघांमधले प्रेम लव्ह एट फर्स्ट साईट नसल्याचे काजोलने सांगितले होते. अजय आणि काजोलची भेट ‘हलचल’ सिनेमाच्या सेटवर झाली होती. सुरुवातीला या दोघांची मैत्री झाली. विशेष म्हणजे काजोल अजयशी जेव्हा पहिल्यांदा भेटली होती, तेव्हा अजयला किना-यावर एकटे बसायला आवडत होते. तो फार बोलतही नव्हता. मात्र हळूहळू अजय काजोलशी बोलू लागला आणि याप्रकारे आमची मैत्री झाली असल्याचे काजोलने सांगितले. १९९९मध्ये हे जोडप लग्नगाठीत अडकलं. अजय-काजोल या जोडीने ‘ इश्क’, ‘प्यार तो होना ही था’, ‘दिल क्या करे’, ‘राजू चाचा’, आणि ‘यू मी और हम’,असे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले. दिलीप कुमार यांच्यासोबत सिनेमा करण्याची अजयची तीव्र इच्छा होती. ‘असर: द इम्पेक्ट’ नामक चित्रपटाची योजनाही त्याने तयार केली होती. पण काही कारणास्तव हा प्रोजेक्ट बारगळला. अजयला आजही याचे दु:ख आहे.