Join us

​Birth day Special : लग्नाआधी ‘या’ आघाडीच्या अभिनेत्रींसोबत जोडले गेले अजय देवगणचे नाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2018 5:48 AM

बॉलिवूडचा ‘सिंघम’अभिनेता अजय देवगण याचा आज (२ एप्रिल) वाढदिवस. आपल्या दमदार अभिनयाने कोट्यवधी चाहत्यांची मने जिंकणारा अजय एक मितभाषी ...

बॉलिवूडचा ‘सिंघम’अभिनेता अजय देवगण याचा आज (२ एप्रिल) वाढदिवस. आपल्या दमदार अभिनयाने कोट्यवधी चाहत्यांची मने जिंकणारा अजय एक मितभाषी अभिनेता म्हणून ओळखला जातो. पण या मितभाषी अभिनेत्याची लव्ह लाईफ मात्र बरीच ‘बोलकी’ राहिलीयं. आज अजय पत्नी काजोलसोबत आनंदी सहजीवन जगतोय. पण काजोल आयुष्यात येण्यापूर्वी अजयचे नाव रवीना टंडन व करिश्मा कपूर या दोन अभिनेत्रींशी जोडल्या गेले.९० च्या दशकात अजय व रवीना टंडन यांच्या रिलेशनशिपची बरीच चर्चा रंगली होती. दोघांनीही एकऋ बरेच हिट सिनेमे दिलेत. याचदरम्यान हे दोघे जवळ आल्याचे मानले जाते. पण पुढे या लव्हस्टोरी एक अनपेक्षित वळणं आलं. असे म्हणतात की, रवीनाला डेट करत असतानाच, करिश्मा कपूर अजयच्या आयुष्यात आली. करिश्मा कपूरसाठी अजयने रवीनाला धोका दिला असेही म्हटले जाते. पण अजयने कायम या बातम्यांचे खंडन केले आहे.रवीना व करिश्मानंतर अजयच्या आयुष्यात काजोलची एन्ट्री झाली. आमच्या दोघांचे प्रेम ‘लव्ह एट फर्स्ट साईट’ नसल्याचे काजोलने एका मुलाखतीत सांगितले होते. अजय आणि काजोलची भेट ‘हलचल’ सिनेमाच्या सेटवर झाली होती. सुरुवातीला या दोघांची मैत्री झाली आणि पुढे प्रेम. अजय आधीच अबोल होता. शूटींग संपले की, अजय दूर एकटा बसून राहायचा.  अजयचे असे वागणे बघून हा खूप अहंकारी असावा, असा काजोलचा समज झाला होता. एक दिवस  काजोल स्वत:हून अजयशी बोलली.  हळूहळू अजयही काजोलशी बोलू लागला आणि  त्यांची मैत्री झाली. १९९९ मध्ये हे जोडपं लग्नगाठीत अडकलं.  अजय चित्रपटांत आला तेव्हा त्याच्या दिसण्यावरून त्याची खिल्ली उडवली गेली होती. तू हिरो मटेरियल नाहीस, असे लोक त्याला तोंडावर म्हणायचे. पण अमिताभ यांनी अजयला ‘डार्क हॉर्स’ संबोधले   होते. अमिताभ यांचे शब्द अक्षरश: खरे ठरले. अजय बिग बींच्या कसोटीवर एकदम खरा उतरला. सन १९८५ मध्ये अजयने ‘प्यारी बहना’ या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारली होती.  ‘फुल और कांटे’ हा हिरो म्हणून अजयचा पहिला चित्रपट होता. अजयच्या या पहिल्याच चित्रपटाला बॉक्सआॅफिसवर यश राज यांच्या ‘लम्हें’सोबत संघर्ष करावा लागला. ‘लम्हें’मध्ये अनिल कपूर व श्रीदेवी अशी हिट जोडी होती. पण अजयने या चित्रपटाला जोरदार मात दिली. दोन मोटरसायकलवर उभे राहून स्टंटबाजी करतानाचा या चित्रपटातील अजयचा सीन कमालीचा लोकप्रीय झाला. हा सीन अजयच्या रिअल लाईफमधील सीन होता. खºया आयुष्यात कॉलेजमध्ये त्याने अशी स्टंटबाजी अनेकदा केली होती.  त्याची हीच रिअल लाईफ स्टंटबाजी ‘फुल और कांटे’मध्ये दाखवली गेली. पुढे तू कुठल्याच चित्रपटात धोकादायक स्टंट सीन्स करणार नाही, असे वचन अजयच्या आईने त्याच्याकडून घेतले आहे. त्यामुळे स्टंट सीन्स करताना अजय अतिशय सतर्क असतो.अजयचे खरे नाव विशाल आहे. कॉलेजमध्ये त्याच्या मित्रांमध्ये तीन गँग प्रसिद्ध होत्या. दारा सिंहचा मुलगा बिंदू याची ‘बिंदू गँग’, धर्मेंन्द्र यांचा मुलगा बॉबी देओल याची ‘बॉबी गँग’ आणि अजय देवगणची ‘विशाल गँग’. अजय मोठ मोठे इंटरव्ह्यू देणे आवडत नाही. डान्सचे म्हणाल तर हे करताना त्याच्या नाकीनऊ येते. अजयचे संपूर्ण कुटुंब दुर्गा देवीचे उपासक आहेत. अजय दरवर्षी चादर चढवायला अजमेरच्या दरग्यावरही जातो. अजयला फिल्मी पार्टी, अवार्ड्स शो आवडत नाही. काम संपले की तो घरी परततो. पार्ट्यांपेक्षा त्याला मुलांसोबत वेळ घालवणे अधिक आवडते.ALSO READ : अजय देवगणने ‘या’ अभिनेत्रीची केली अशी मस्करी की तिच्या डोळ्यात आले अश्रू !‘फुल और कांटे’नंतर अ‍ॅक्शन हिरो अशी अजयची ओळख झाली होती. त्यामुळे यानंतर आलेल्या ‘प्लेटफॉर्म’, ‘संग्राम’, ‘शक्तिमान’,‘कानून’ अशा अनेक चित्रपटात अजय केवळ अ‍ॅक्शन करताना दिसला. अभिनेता म्हणून त्याला कुणीच गंभीरपणे घेत नव्हते. अखेर काळाची गरज ओळखून अजयने अचानक यु टर्न घेत  महेश भट्ट यांचा ‘जख्म’ साईन केला. या चित्रपटात अजयमधील ख-या अभिनेत्याचे दर्शन घडले.दिलीप कुमार यांच्यासोबत सिनेमा करण्याची अजयची तीव्र इच्छा होती. ‘असर: द इम्पेक्ट’ नामक चित्रपटाची योजनाही त्याने तयार केली होती. पण काही कारणास्तव हा प्रोजेक्ट बारगळला. अजयला आजही याचे दु:ख आहे.