Join us

Birthday Special : या आजाराने पीडित होता अर्जुन कपूर; पाहा, हिरो बनण्याआधीचे फोटो !!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 8:00 AM

अभिनेता अर्जुन कपूरचा आज (२६ जून) वाढदिवस.  निर्माते बोनी कपूर यांचा मुलगा ही ओळख अर्जुनने कधीच पुसली.  आज अर्जुनने स्वबळावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक आगळे-वेगळे स्थान निर्माण केले आहे.

ठळक मुद्देहिरो बनण्याचा अर्जुनचा प्रवास सोपा नव्हता. त्याचा लठ्ठपणा या मार्गातील सर्वात मोठी अडसर होता.

अभिनेता अर्जुन कपूरचा आज (२६ जून) वाढदिवस.  निर्माते बोनी कपूर यांचा मुलगा ही ओळख अर्जुनने कधीच पुसली.  आज अर्जुनने स्वबळावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक आगळे-वेगळे स्थान निर्माण केले आहे. श्रीदेवी यांच्या अकाली निधनानंतर अर्जुनने केवळ डॅड बोनी कपूर यांनाच नाही; आपल्या दोन्ही सावत्र बहिणी जान्हवी व खुशी यांनाही सावरले. सावरलेच नाही त्यांच्या पाठीशी खंबीर आधार बनून उभा राहिला. 

चित्रपटात येण्याआधी अर्जुनचे वजन 140 किलो होते. त्यामुळे हिरो बनण्याचे तर सोडा पण आपण काहीच करू शकणार नाही, असे अर्जुनला वाटायचे. याच काळात सलमान खानने अर्जुनला वजन कमी करण्याचा सल्ला दिला आणि अर्जुनने प्रचंड मेहनतीने वजन कमी करून ‘इशकजादे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.

हिरो बनण्याचा अर्जुनचा प्रवास सोपा नव्हता. त्याचा लठ्ठपणा या मार्गातील सर्वात मोठी अडसर होता. शिवाय तो अस्थमानेही पीडित होता. वाढलेले वजन आणि अस्थमा यामुळे अर्जुन १० सेकंदही धावू शकायचा नाही. हा लठ्ठपणा आणि अस्थमाचा आजार हे दोन्ही अर्जुनने स्वीकारले होते. एका मुलाखतीत तो बोलला होता. माझा लठ्ठपणा माझ्या आयुष्याचे वास्तव होते आणि हे वास्तव मी स्वीकारले होते. मला कधीच वजन कमी करावे, असे वाटले नव्हते, असे त्याने सांगितले होते.पण सलमानने अर्जुनला एक स्वप्न दाखवले. हे स्वप्न होते हिरो बनण्याचे. वजन कमी केलेस तर तू हिरो बनू शकतोस, हे सलमानचे शब्द अर्जुनने ऐकले आणि त्याचक्षणी वजन कमी करण्याचा निर्धार केला.

अर्जुनने याबद्दलही खुलासा केला होता. मी आणि सलमान एकत्र वर्कआऊट करायचो. तो सतत माझ्या खाण्यावर लक्ष ठेवून असायचा. मी जणू मशीन आहे आणि ही मशीन वजन कमी करणार, असेच त्याला वाटायचे. पण सलमानच्या डेडीकेशन आणि डिसीप्लीनमुळेच मी माझे वजन कमी करू शकतो. त्याने माझे आयुष्य बदलले. मी आज जे काही आहे, ते सलमानमुळे, असे अर्जुन म्हणाला होता.

टॅग्स :अर्जुन कपूर