खिलाडी , जो जीता वही सिकंदर , बलमा , रंग आणि वक्त हमारा है' यांसारख्या सुपरहिट बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकलेली अभिनेत्री आयशा जुल्का आज बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. पण हस-या चेह-याच्या आयशाला विसरणे शक्य नाही. आज आयशाचा वाढदिवस. 28 जुलै 1972 रोजी श्रीनगरमध्ये आयशाचा जन्म झाला.
बॉलिवूडला अलविदा म्हणणारी आयशा जुल्का आज एक बिझनेस वूमन आहे. बॉलिवूडमध्ये असताना आयशाचे नाव अनेक अभिनेत्यांशी जोडले. यापैकी एक म्हणजे, अक्षय कुमार. असे म्हणतात की, आयशा अक्षयबद्दल सीरिअर होती. पण अक्षयला मुळातच सीरिअस रिलेशनशिप नको होते. साहजिकच दोघांचेही नाते तुटले.
२२ वर्षे मोठ्या अभिनेत्यावरही झाली होती फिदा
करिअरच्या एका टप्प्यावर असताना आयशाने मिथुन चक्रवर्तीसोबतही काम केले. 1993 मध्ये प्रदर्शित दलाल या चित्रपटात आयशा व मिथुन यांची जोडी जमली. याच चित्रपटाच्या सेटवर दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागल्याचीही चर्चा त्यावेळी रंगली.
नाना पाटेकरसोबतही रंगल्या अफेअरच्या चर्चा
आयशाचे नाव नाना पाटेकरसोबतही जोडले गेले. 2003 मध्ये नाना पाटेकर व आयशाने ‘आंच’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटात दोघांनीही बोल्ड सीन दिले. याचदरम्यान दोघांच्या अफेअरच्या चर्चा पसरल्या. पण पुढे नानाच्या सनकी वागण्यामुळे त्रासून आयशाने नानासोबतचे संबंध संपुष्टात आणले.
म्हणून संपले करिअर
‘दलाल’ या चित्रपटात मिथुन व आयशावर अनेक बोल्ड सीन्स चित्रीत करण्यात आले. या चित्रपटातील डबल मिनिंगची गाण्यांवरही वाद झाला. या वादावर स्पष्टीकरण देताना आयशाने माझ्या नकळत हे बोल्ड सीन्स चित्रीत करण्यात आल्याचा आरोप केला होता. बोल्डनेसचे हे प्रकरण कोर्टातही गेले. या वादानंतर आयशाचे करिअर जवळजवळ संपुष्टात आले आणि आयशा बॉलिवूडमधून बाद झाली.
2003 पर्यंत आयशाचे करिअर जवळजवळ संपुष्टात आले होते. याकाळात ती सिनेमांमध्ये मुख्य नायिकेच्या नव्हे तर सहायक अभिनेत्रीच्या रुपात झळकू लागली होती. याचकाळात तिने लग्नाचा निर्णय घेतला. 2003मध्ये आयशाने समीर वाशी नावाच्या तरुणाशी लग्न केले. समीर बिझनेसमॅन असून त्यांचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे. त्यांना रिअल इस्टेट टायकून म्हणून ओळखले जाते. मुंबईतील अंधेरी स्थित तिरुपती अपार्टमेंटमध्ये आयशा आपल्या कुटुंबासोबत राहते. या दाम्पत्याला एक मुलगी असून तिचे नाव स्नेह जुल्का आहे.