Join us

Birthday Special : बॉलिवूडची ही अभिनेत्री ऑस्ट्रेलियन क्रिकेटरसोबत होती रिलेशनशीपमध्ये, आता आहे दोन मुलांची आई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 11:52 AM

क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते तसे जुने आहे. आतापर्यंत अनेक खेळांडू बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्या आहेत.

क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते तसे जुने आहे. आतापर्यंत अनेक खेळांडू बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्या आहेत. तसेच फार कमी लोकांना माहित आहे की मलायका अरोराची बहिण आणि अभिनेत्री अमृता अरोरादेखील एका क्रिकेटरसोबत अफेयरमध्ये होती. ती ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर उस्मान अफजलसोबत रिलेशनशीपमध्ये होती.

अमृताचे लग्न शकील लडकसोबत झाले असून तो एक बिझनेसमॅन आहे. शकीलसोबत लग्न करण्याआधी अमृताचे एक प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. अमृता एका क्रिकेटरसोबत नात्यात होती आणि तिने ही गोष्ट अनेकवेळा सांगितली देखील होती. 

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर उस्मान अफजलसोबत अमृता नात्यात होती. त्या दोघांना अनेकवेळा एकत्र फिरताना पाहाण्यात आले होते. एवढेच नव्हे तर ते दोघे मीडियातदेखील एकमेकांविषयी बिनधास्तपणे बोलत असत. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, मला विश्वास आहे की, तो केवळ माझ्यासाठी बनला आहे आणि योग्य वेळ येईल त्यावेळी आम्ही आमच्या नात्याला कायदेशीर मान्यता देऊ...

 कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात काही वर्षांपूर्वी मलायका अरोरा आणि अरबाज खान झळकले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत अमृता आणि उस्मानने या कार्यक्रमात हजेरी लावली होती. शकील आणि अमृता यांचे लग्न २००९ मध्ये झाले होते. त्यांना दोन मुलं असून ती अनेकवेळा सोशल मीडियावर कुटुंबियांचे फोटो पोस्ट करत असते.

शकीलचे अमृतासोबतचे लग्न हे दुसरे असून निशा राणा हे त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव आहे. २००६ मध्ये त्याने निशासोबत घटस्फोट घेतला होता.

अमृता अरोराने कितने दूर कितने पास या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील करियरला सुरुवात केली. यानंतर तिने आवारा पागल दीवाना, हॅलो, गोलमाल रिटर्न्स यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. कुछ तो है तेरे मेरे दरमियाँ हा तिचा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. पण त्यानंतर ती कोणत्याच चित्रपटात झळकली नाही.

अमृताला बॉलिवूडमध्ये तितकेसे यश मिळाले नसल्याने तिने अभिनयक्षेत्रापासून दूर राहाणेच पसंत केले. 

टॅग्स :मलायका अरोरा