माजी मिस इंडिया व बॉलिवूड अभिनेत्री नफीसा अली यांचे सिनेकारकीर्द भलेही छोटी असली तरीदेखील त्यांची ओळख कोणत्या स्टारपेक्षा कमी नाही. १८ जानेवारी, १९५७मध्ये जन्म झालेल्या नफीसा यांना जीवनात खूप अडचणींचा सामना करावा लागला. त्यांनी कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी निर्धास्तपणे सामना केला. परिस्थितीशी लढणे आणि जिंकणे नफीसा यांची सवय राहिली आहे. त्यांनी त्यांचे प्रेम मिळवण्यासाठीदेखील असेच काही केले होते.
नफीसा अली यांचा जन्म एका मुस्लीम बंगाली कुटुंबात झाला होता. त्या नॅशनल स्विमिंग चॅम्पियन राहिल्या आहेत आणि १९७६मध्ये मिस इंडिया बनल्या आहे. नफीसा यांना एका आर्मी ऑफिसरवर प्रेम झाले होते. ते होते कर्नल आणि पोलो प्लेअर रणवीर सिंग सोढी.
नफीसाला तिच्या सासूने स्वीकारले नाही. त्यामुळे नफीसा यांना नवरा रणवीर यांच्या मित्रांच्या घरी राहावे लागले. मात्र काही दिवसांनंतर सासूचा मोठा भाऊ तिथे आला आणि त्यांच्यासोबत घरी चलण्याची विनंती केली. त्यांनी नफीसा अली यांची माफीदेखील मागितली.
त्यानंतर नफीसा व रणवीर यांच्या रितीरिवाजासोबत लग्न लावून दिले.
नफीसा यांना तिसऱ्या स्टेजचा कर्करोग झाला होता. मात्र आता त्या बऱ्या झाल्या आहेत. त्यांनी ही माहिती सोशल मीडियावर दिली होती.
नफीसा अली यांच्या सिनेइंडस्ट्रीतील कामाबद्दल सांगायचं तर त्यांनी मेजर साहब, यह जिंदगी का सफर, बेवफा, लाइफ इन अ मेट्रो आणि गुजारिश या चित्रपटात काम केलं आहे.
त्या शेवटच्या साहेब बीवी और गँगस्टर 3 चित्रपटात झळकल्या होत्या.