Join us

BIRTHDAY SPECIAL ​: सेलिना जेटली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2016 9:39 AM

माजी विश्वसुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली हिचा आज वाढदिवस. सन २००१ मध्ये सेलिनाने 'फेमिना मिस इंडिया' या सौंदर्य ...

माजी विश्वसुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली हिचा आज वाढदिवस. सन २००१ मध्ये सेलिनाने 'फेमिना मिस इंडिया' या सौंदर्य स्पधेर्चा किताब जिंकला. यानंतर ती बॉलिवूडमध्ये आली.‘जानशीन’ या चित्रपटाद्वारे सेलिनाने बॉलिवूड डेब्यू केला. सेलिनाचे वडील भारतीय सैन्य दलाचे सेवानिवृत्त कर्नल आहेत. तिचा एक भाऊ भारतीय सैन्यात आहे.तिच्या आयुष्याशी निगडित ही काही रंजक माहिती -- लहानपणी सेलिनाला सुद्धा सैन्य दलात भरती व्हायचे होते. डॉक्टर वा वैमानिक होण्याची तिची इच्छा होती. पण नियतीला वेगळेच काही मान्य होते. २००१ मध्ये सेलिना विश्वसुंदरी बनली आणि त्यानंतर बॉलीवूडचे दरवाजे तिच्यासाठी आपोआप उघडले.                                                                        फेमिना मिस इंडिया : सेलिना जेटली- सन २००७ मध्ये सेलिना आपल्या ‘लव्ह हॅज नो लँग्वेज’ या पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी न्यूझीलंडला गेली होती. या ठिकाणी भारतापासून तिचा कुणीतरी पिच्छा पुरवला. या घटनेने सेलिनाला मोठा मानसिक धक्का बसला होता.- सेलिना समलैंगिक अधिकार आंदोलनाची आग्रही समर्थक आहे. याविषयावर ती नेहमीच तिची ठाम मते मांडत आलीय.                                                                        द जेटलीज् : सेलिना जेटली पती पीटर हॅग आणि दोन जुळ्या मुलांसमवेत.- सेलिनाने २३ जुलै २०११ रोजी दुबईती व्यवसायिक पीटर हॅगसोबत लग्न केले. सेलिना व पीटर यांना दोन जुळे मुले आहे. विस्टन व विराज अशी या दोघांची नावे आहेत. लहानपणीच या दोघांचे ट्विटर अकाउंट बनविण्यात आलेले असून दोघांचे ५००च्या आसपास फॉलोवर्स आहेत.