Birthday Special : धोनी व युवराजचं नाही तर यांच्यासोबतही होते दीपिका पादुकोणचे अफेअर!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2018 5:00 AM
बॉलिवूडच्या १०० कोटी क्लबची ‘क्वीन’ दीपिका पादुकोण हिचा आज (५जानेवारी) वाढदिवस. मॉडेलिंगमधून बॉलिवूडमध्ये आलेल्या दीपिकाने अगदी फार कमी वेळात ...
बॉलिवूडच्या १०० कोटी क्लबची ‘क्वीन’ दीपिका पादुकोण हिचा आज (५जानेवारी) वाढदिवस. मॉडेलिंगमधून बॉलिवूडमध्ये आलेल्या दीपिकाने अगदी फार कमी वेळात खूप मोठे नाव कमावले आणि बघता बघता बॉलिवूडच्या १०० कोटी क्लबची ‘क्वीन’ बनून मिरवू लागली. सध्या दीपिकाचे नाव रणवीर सिंगसोबत जोडले जातेय. पण खरे तर रणवीरआधी दीपिकाच्या आयुष्यात अनेकजण येऊन गेलेत. त्यामुळे जेवढी चर्चा तिच्या सिनेमांची झाली, तेवढीच तिच्या लव्ह-अफेअर्सचीदेखील चर्चा झाली. निहार पंड्या रणवीर सिंग आयुष्यात येण्यापूर्वी दीपिका अभिनेता रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. रणबीर हेच दीपिकाचे पहिले प्रेम आहे, असे अनेकांना वाटते. पण असे नाहीच. रणबीर कपूर नव्हे तर निहार पंड्या हे दीपिकाचे पहिले प्रेम होते. दीपिका निहारसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही होती, अशीही चर्चा होती. दोघांची भेट एका अॅक्टिंग स्कूलमध्ये झाली होती आणि तेथूनच दोघांमध्ये प्रेम बहरले. त्यावेळी दीपिका मॉडेलिंग करत होती आणि बॉलिवूडमध्येही तिचा संघर्ष सुरु होता. यादरम्यान दीपिका व निहार तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिले. पण तीन वर्षांच्या अफेअरनंतर दोघांचे ब्रेकअप झाले.उपेन पटेल निहार पंड्यानंतर दीपिकाचे नाव अभिनेता उपेन पटेलसोबत जुळले. अर्थात हा रोमान्स फार काळ नव्हताच. कारण याचदरम्यान दीपिकाच्या आयुष्यात एका धडाकेबाज तरूणाची एन्ट्री झाली आणि उपेन बाद झाला.युवराज सिंग उपेन पटेलला बाद करणारा हा धडाकेबाज तरूण होता युवराज सिंग. होय, क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेल्या युवराजने दीपिकाच्या आयुष्यात एन्ट्री घेतली आणि दीपिका युवीच्या प्रेमात पडली. त्याकाळात दोघेही अनेकदा एकत्र फिरतांना दिसले होते. अर्थात हे रिलेशनही फार काळ टिकले नाहीच. खरे तर युवराजआधी दीपिका महेन्द्रसिंग धोनीला डेट करत होती, असेही म्हटले जाते. पण मध्येच युवराजने एन्ट्री घेतली आणि धोनीने माघार. युवराज व दीपिकाची वाढती जवळीक बघून धोनीने दीपिकापासून दूर जाणे पसंत केले.सिद्धार्थ माल्या युवराज सिंगनंतर दीपिकाचे नाव विजय माल्याचा मुलगा सिद्धार्थ माल्यासोबतही जुळले. सिद्धार्थसोबत दीपिकाचे अफेअर बरीच वर्षे चालले. दोघांनाही एकत्र फिरताना, पार्टी करताना यादरम्यान पाहिले गेले होते. सिद्धार्थ माल्याने दीपिकाला एक फ्लॅटही गिफ्ट केल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. दीपिका सिद्धार्थच्या प्रेमात अशी काही बुडाली होती की माल्याच्या प्रत्येक किंगफिशर पार्टीत व फॅशन शोमध्ये ती असायचीच. पण हे नातेही शेवटी तुटले. रणबीर कपूर सिद्धार्थ माल्यानंतर दीपिकाच्या आयुष्यात रणबीर कपूर आला. २००८मध्ये े‘बचना ए हसीनों’मध्ये रणबीर व दीपिकाने काम केले आणि याचसेटवर त्यांचे प्रेम बहरले. दोघांनीही हे अफेअर लपवण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. दीपिकाने तर रणबीरच्या नावाचा टॅटूही बनवला होता. पण एक - दोन वर्षातच दोघांचे ब्रेकअप झाले. रणबीर दीपिकाला सोडून कॅटरिना कैफमध्ये गुंतला आणि दीपिका व रणबीरचे ब्रेकअप झाले. यानंतर दीपिका डिप्रेशनमध्ये गेली होती. अर्थात आता ती यातून पूर्णपणे बाहेर आली आहे आणि रणबीर व ती सध्या चांगले मित्र आहेत.रणवीर सिंग ALSO READ : ‘या’ कारणामुळे रणवीर-दीपिकाचा होणार नाही साखरपुडा?रणबीर कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर डिप्रेशनमध्ये गेलेल्या दीपिकाला रणवीर सिंगचा आधार मिळाला. प्रेमात वारंवार मिळणारा धोका आणि एकटेपणा यामुळे दीपिका निराश झाली होती. पण रणवीरने तिला यातून बाहेर काढले. मध्यंतरी या दोघांचेही ब्रेकअप झाल्याची खबर होती. पण यानंतर पुन्हा दोघे एकत्र दिसले. आता तर त्यांच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत.