आपल्या खट्याळ हास्याने आणि अभिनयाने एकेकाळी प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री जुही चावला हिचा आज वाढदिवस. 13 नोव्हेंबर 1967 रोजी लुधियानात जुहीचा झाला. ‘सल्तनत’ या चित्रपटातून जुहीने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. पण तिचा हा पहिलाच सिनेमा सुपरफ्लॉप झाला. यानंतरच्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाने मात्र जुहीला खरी ओळख मिळाली. पुढे तिने अनेक हिट चित्रपट दिलेत.
आज जुहीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या ‘किस’चा किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. होय, ८०च्या दशकात एकापेक्षा एक सुपरडुपर हिट चित्रपट देणाºया जुहीने सुपरस्टार आमिर खानला किस करण्यास नकार दिला होता.
1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क’च्या सेटवरचा हा किस्सा. या चित्रपटात जुहीशिवाय आमिर खान, अजय देवगण व काजोल मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात जुही व आमिर यांच्यात एक किसींग सीन चित्रीत होणार होता. आधी जुही या सीनसाठी तयार होती. पण आमिरने ऐनवेळी या सीनमध्ये काही बदल केलेत. हे बदल जुहीला काहीसे खटकले आणि तिने हा किस सीन करण्यास चक्क नकार दिला. यानंतर आमिर व जुही यांच्यात जोरदार भांडण झाले होते. आमिरने एका मुलाखतीत, ‘इश्क’च्या सेटवर माझे व जुहीचे चार-पाचवेळा भांडण झाल्याचे सांगितले होते.
त्याआधी 1988 मध्ये आलेल्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाच्या सेटवरही जुहीने आमिरला किस करण्यास नकार दिला होता. या चित्रपटातील ‘अकेले है तो क्या गम है’ या गाण्यात जुहीला आमिरच्याच्या गालाचे व माथ्याचे चुंबन घ्यायचे होते. पण जुहीने यास नकार दिला. यामुळे चित्रपटाचे शूटींग 10 मिनिटे थांबवण्यात आले होते अखेर दिग्दर्शक मंसूर खान यांनी जुहीला समजावले आणि तेव्हा कुठे तिने हा सीन दिला होता.
‘कयामत से कयामत तक’शी निगडीत जुहीबद्दलचा आणखी एक किस्सा सांगितला जातो. 80 च्या दशकात चित्रपटाचा प्रचार करण्यासाठी मोजकीच माध्यमे होती. त्यामुळे ‘कयामत से कयामत तक’च्या रिलीजसाठी चित्रपटातील कलाकार आमिर खान आणि जुही चावलाने खुद्द या चित्रपटाचे पोस्टर रिक्षा चालकांना वाटले होते आणि हे पोस्टर्स रिक्षाच्या मागे लावण्याची विनंती केली होती.